मुख्य सामग्रीवर वगळा

दोन रजत कमळांचा ‘अभिजात’ मानकरी ‘अभिजित’

अभिजित दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा... ----------------------------------- ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना ? की ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे बोलायला मिळणं आनंददायक ? ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय ? तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत. ... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच ! कूल... नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे. खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे ! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश मिळ...

रो-को विजय

‘टायगर अभी ज़िंदा है...’
द. आफ्रिकेविरुद्धच्या एक दिवशीय सामन्यांच्या मालिकेत
हे दोघांनी दाखवून दिलं - रोहित आणि विराट.
रो-को जोडीचा खेळ निर्विवाद आणि प्रतिस्पर्ध्याला गप्प करणारा.
-----------
विराट कोहली दोन शतके तडाखेबंद फलंदाजी
रोक सको तो रोक लो... तीन सामन्यांमध्ये दोन शतकं!
............
मायदेशात कसोटी मालिका गमावल्यानंतर पंधरवड्याच्या आतच भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एक दिवशीय सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर (की निवृत्ती घ्यायला लावल्यानंतर?) विराट कोहली आणि रोहित शर्मा पहिल्यांदाच भारतात खेळले.

अजून दोन वर्षांनी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी हे दोघे संघात असतील का नाही? चर्चेचा हा मोठा विषय. पण ह्या मालिकेतील तिन्ही सामन्यांतून त्यांनी आपल्या बॅटने ह्या चर्चेला चोख उत्तर दिले आहे. ह्या मालिकेवर त्यांचीच ठळक छाप उमटली.

मालिकेतील पहिले दोन सामने तुलनेने चुरशीचे झाले. रायपूरच्या लढतीत साडेतीनशेच्या पार जाऊनही भारताला पराभव चाखावा लागला. त्यामुळेच विशाखापट्टणम येथे आज झालेला सामना निर्णायक होता. तो अगदीच एकतर्फी झाला. त्याचे श्रेय आधी कुलदीप यादवला आणि नंतर मैदानात उतरलेल्या तिन्ही फलंदाजांना. त्यातल्या यशस्वीचे शतक, तर रोहित व विराट ह्यांची अर्धशतके. नऊ गडी राखून दणदणीत विजय मिळवला यजमानांनी.

मालिकेचा मानकरी विराट ठरला, ह्यात नवल नाही. त्यानं दोन शतकांसह ३०२ धावा केल्या. मालिकेत भारताच्या मिळून ९७८ धावा. म्हणजे संघाच्या धावसंख्येपैकी ३०.८७ टक्के धावा एकट्या विराटच्या. अलीकडच्या काही वर्षांत आणि काही महत्त्वाच्या लढतींमध्ये दिसून आलं की, विराट फटकेबाजी न करता एकेरी, दुहेरी धावांवर भर देतो. ती शैली ह्या मालिकेत विराटनं बदलली. तीन डावांमध्ये त्यानं २४ चौकार आणि १५ षट्कार अशी आतषबाजी केली. रोहितचे जेवढे चौकार आहेत, तेवढे विराटचे षट्कार.

रोहित शर्मा हिटमॅन दोन अर्धशतके
ह्या टायगरनंही डरकाळ्या फोडल्या!
............
वय झालं असं ज्याच्या बाबतीत म्हटलं जातं, असा दुसरा खेळाडू रोहित शर्मा. त्यानंही मालिकेत दोन अर्धशतकं झळकावली. त्याच्या एकूण १४६ धावा (१५ चौकार व ६ षट्कार) आणि त्या संघाच्या धावांच्या १४.९२ टक्के. विराट आणि कोहली ह्यांच्या मिळून धावा ४५.८ टक्के! कर्णधार राहुल (दोन अर्धशतकं), ऋतुराज गायकवाड व यशस्वी जयस्वाल (प्रत्येकी एक शतक) ह्यांनीही आपली भूमिका बजावली.

महत्त्वाचं म्हणजे मालिकेत पाहुण्यांचा संघ दोनदा पूर्ण बाद झाला. त्याच्या उलट भारताने फक्त १४ गडी गमावले. कुलदीप यादवनं सर्वाधिक नऊ बळी घेतले. प्रसिद्ध कृष्णानं सात बळी घेतले, पण त्यासाठी बऱ्यापैकी धावा मोजल्या. अर्शदीप सिंग ह्यानं पाचच बळी घेतले खरे; तथापि त्यानं षट्कामागे दिलेल्या धावा जेमतेम साडेपाच होत्या.

भारतानं मालिका जिंकली, हे महत्त्वाचं. पण त्याहून सुखद गोष्ट म्हणजे ‘टायगर अभी ज़िंदा है...’ हे सांगणाऱ्या विराट व रोहित ह्यांच्या डरकाळ्या!

(छायाचित्र सौजन्य – bcci.tv)
.........

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘ळ’च्या अढळपदासाठी

  रचना - शब्दकुल ‘ ध ’ चा ‘ मा ’ केल्यानं काय होतं, हे मराठी माणसाला चांगलं माहीत आहे. ते ऐतिहासिक सत्य आहे. म्हणजे अक्षरांतर इतिहास घडवतं ! इतिहासाचा हा धडा आपण शिकलो, पण गिरवला नाही, असंच दिसत होतं. वर्तमानात ‘ ळ ’ चा ‘ ल ’ केला जात होता आणि ‘ च ल ता है... ’ अशी आपली त्याबाबतची वृत्ती होती. लोकमान्यांचं टिळक आडनाव हिंदीत बनायचं ‘ ति ल क ’ . बाळासाहेब ठाकरे ह्यांचं नाव हिंदी माध्यमांतून व्हायचं ‘ बाला साहब ’ . नाशिक जिल्ह्यात आहे मालेगाव आणि पुणे जिल्ह्यातलं ते माळेगाव. पण हिंदीत गेली की, दोन्ही गावं एक होतात. बातमी नेमकी कुठली ते कळायला मार्ग नाही. लोणावळे, जळगाव, भुसावळ, करमाळा आदी स्थाननामांतील आणि काळे, साळी, माळी, जगदाळे, बाळू आदी व्यक्तिनामांतील ‘ ळ ’ जाऊन तिथं ‘ ल ’ कसा येतो ? हिंदीमध्ये ‘ ळ ’ च्या जागी ‘ ल ’ का, हा प्रश्न पुण्यातील आयुर्विमा अधिकारी प्रकाश निर्मळ ह्यांना छळत होता. हा अक्षरबदल खटकत होता. त्यांनी दाद मागायचं ठरवलं. अक्षरांतर होऊ नये, ह्यासाठी २०१८ पासून प्रयत्न सुरू केले. ' ळ ' ऐवजी ' ल ' चा वापर चुकीचा आहे. हिंदीमध्ये ' ळ ' च वा...

पहिला फोटो, 'केसरी' आणि ५१ रुपयांचे बक्षीस

स्वतःचा पहिला फोटो छापून येणं आणि शिवाय त्यासोबत बक्षीसही. किती मोठी गोष्ट होती ती त्या काळातली आणि आजचीही! दैनिक केसरीमध्ये लिहिलेलं वाचकाचं पत्र आणि त्याची त्या महिन्यातली सर्वोत्तम पत्र म्हणून झालेली निवड. बरोब्बर ४० वर्षांपूर्वी - ९ सप्टेंबर १९८६! ----------- ‘ लवकर उठायचंच आज ’ असा निश्चय करून ( नेहमीप्रमाणेच) उशिरा उठलो. सगळं आवरून दुपारच्या सुमारास कार्यालयात गेलो. ‘ शतायुषी ’ दिवाळी अंकात संपादकीय सहायक म्हणून काम करायला सुरुवात झाली होती. ‘ पत्रकार ’ ह्या नात्यानं पहिली नोकरी. हल्लीच्या भाषेत सांगायचं तर ‘ कॅम्पस इंटरव्ह्यू ’ मधून निवड झालेली होती माझी. परीक्षेचा निकाल लागण्याच्या आधीच. संज्ञापन व वृत्तविद्या विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्र. ना. परांजपे ह्यांचे घरच्या पत्त्यावर कार्ड आले होते - ‘ एका दिवाळी अंकाच्या संपादकांना सहायकाची गरज आहे. तुम्हाला रस असेल तर कार्यालयीन वेळेत भेटायला यावे. ’ (ते पोस्टकार्ड अजून संग्रहात आहे.😅) कसा कोणास ठाऊक, पण प्र. ना. ह्यांचा मी बऱ्यापैकी लाडका विद्यार्थी होतो. त्यामुळेच त्यांना ह्या जागेसाठी माझी आठवण झाली. त्या दिवशी त्यांनी...

गावसकर नावाचं गारूड आणि 'क्रीडांगण'चा विशेषांक

  ते वर्ष महत्त्वाचंच होतं. आता इतिहासात स्थान मिळवलेल्या अनेक घडामोडी त्या वर्षात घडल्या. उदाहरणार्थ, इदी अमिन ह्यांनी लष्करी उठाव करून युगांडाची सत्ता ताब्यात घेतली. चीननं अमेरिकेच्या टेबल टेनिस संघाला आमंत्रण देऊन ‘ पिंगपाँग डिप्लोमसी ’ सुरू केली. अमेरिकेनं सव्विसावी घटनादुरुस्ती करून मतदाराचं वय १८ वर्षावर आणलं. भारत आणि सोव्हिएत रशिया ह्यांनी २० वर्षांच्या मैत्री करारावर स्वाक्षऱ्या केल्या. ‘ द न्यू यॉर्क टाइम्स ’ नं ‘ पेंटॅगॉन पेपर्स ’ प्रसिद्ध करून युद्धखोर अमेरिकी सरकारचा खोटारडेपणा उघडकीस आणला. ‘ वॉल्ट डिस्ने वर्ल्ड थीम पार्क ’ चं उद्घाटन झालं. वगैरे वगैरे... ते वर्ष होतं १९७१. हिमाचल प्रदेशाच्या रूपानं भारतात अठरावं राज्य निर्माण झालं. पश्चिम बंगालला महापुराचा आणि ओडिशाला (तेव्हा ओरिसा) वादळाचा महाभयंकर तडाखा बसला. वरच्या सगळ्या घटना-घडामोडी महत्त्वाच्या आहेत. पण सर्वसामान्य भारतीयांसाठी त्याहून खूप खूप महत्त्वाचं असं ह्याच वर्षानं दिलं. पूर्व पाकिस्तानातील मुक्ती वाहिनीच्या हाकेला प्रतिसाद देत आपल्या सैन्यदलानं पाकिस्तानची नांगी ठेचली ती हेच वर्ष संपता संपता. बा...