‘त्या गाठी’ तिथे कोठे तरी ‘वर’ बांधल्या जातात म्हणे. काही वेळा ती गाठ अतिशय मुलायम असते, तर काही वेळा घट्ट बांधली जाते. त्यावर नंतरचे आयुष्य स्वर्ग ठरते की नरक, हे अवलंबून असते. अर्थात त्याचा गाठीच्या मुलायमपणाशी किंवा घट्टपणाशी संबंध असतोच, असे ठामपणे म्हणता येणार नाही... हे सर्व तत्त्वज्ञान (ओढून-ताणून) इथे आणणे विनाकारण नसून सबल कारणपरत्वे आहे. लग्नाला कितीही वर्षं झाली तरी बाईची माहेरपणाची ओढ काही संपत नाही. माहेरपेक्षा दुप्पट वर्षं सासरी राहिल्यानंतरही एखादी बाई नवऱ्याला ‘आमच्या घरी अशी पद्धत नव्हती बाई...’ असं सांगते, तेव्हा त्यातला वाच्यार्थ नव्हे तर लक्ष्यार्थ लक्षात घ्यायचा असतो. त्या वाच्यार्थातही तुम्ही लक्ष्य असता, ही गोष्ट वेगळी... काही कामानिमित्त अशाच काही महिला आपल्या मूळच्या गावी आल्या होत्या. ते काहींचे माहेर, काहींचे सासर, तर एखादीचे सासर आणि माहेरही! त्यामुळे गप्पांचा सूर ‘नदीच्या पल्याड बाई झाडी लई दाट तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट...’ असा सारा गदगद झालेला. त्यांनी पाहिलेलं, अनुभवलेलं गाव आता स्वाभाविकच तसं राहिलं नव्हतं. पण त्यांच्या आठवणीत तेच जुनं चित्र असणं स्...
फ्रान्सच्या राजधानीतून - पॅरिस येथून प्रकाशित होणारे ' शार्ली एब्दो ' साप्ताहिक व्यंग्यात्मक लेखनासाठी प्रसिद्ध आहे. त्यात प्रामुख्याने बोचरी व्यंग्यचित्रे असतात. अशाच एका व्यंग्यचित्राचे निमित्त करून इस्लामी अतिरेक्यांनी ७ जानेवारी २०१५ रोजी साप्ताहिकाच्या मुख्यालयावर हल्ला केला. त्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात बारा जण मृत्युमुखी पडले. त्यामध्ये संपादक, व्यंग्यचित्रकार ह्यांच्यासह आठ पत्रकारांचा समावेश होता. त्या पार्श्वभूमीवर दुसऱ्याच दिवशी, आठ जानेवारी २०१५ रोजी लिहिलेली ही रचना त्या वेळी एका अनुदिनीवर प्रकाशित झाली. सध्या फ्रान्समध्ये जे काही चालले आहे आणि त्याचे पडसाद ज्या पद्धतीने जगभर उमटत आहेत, ते पाहिल्यावर साडेपाच वर्षांपूर्वीच्या ह्या लिखाणाची आठवण झाली. हल्ल्याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेले पॅरिसचे रहिवासी. (छायाचित्र सौजन्य - सी. एन. एन.) ------------------------ शब्द हे आहे शस्त्र एकदम जपून वापरा कुंचला म्हणजे अस्त्र थोडे सावरून चालवा पचेल तेच लिहा रुचेल तेच बोला पटेल तेच काढा ऐकत नाही ? मारा-झोडा! पेन ? टाका मोडून! ब्रश ? द्या फेकून! शाई-रंग ? द्...