मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मेलबर्न १९०२. लेबलसह पोस्ट दाखवत आहे

'वर' बांधलेल्या गाठी आणि हुकलेल्या गाड्या!

‘त्या गाठी’ तिथे कोठे तरी ‘वर’ बांधल्या जातात म्हणे. काही वेळा ती गाठ अतिशय मुलायम असते, तर काही वेळा घट्ट बांधली जाते. त्यावर नंतरचे आयुष्य स्वर्ग ठरते की नरक, हे अवलंबून असते. अर्थात त्याचा गाठीच्या मुलायमपणाशी किंवा घट्टपणाशी संबंध असतोच, असे ठामपणे म्हणता येणार नाही... हे सर्व तत्त्वज्ञान (ओढून-ताणून) इथे आणणे विनाकारण नसून सबल कारणपरत्वे आहे. लग्नाला कितीही वर्षं झाली तरी बाईची माहेरपणाची ओढ काही संपत नाही. माहेरपेक्षा दुप्पट वर्षं सासरी राहिल्यानंतरही एखादी बाई नवऱ्याला ‘आमच्या घरी अशी पद्धत नव्हती बाई...’ असं सांगते, तेव्हा त्यातला वाच्यार्थ नव्हे तर लक्ष्यार्थ लक्षात घ्यायचा असतो. त्या वाच्यार्थातही तुम्ही लक्ष्य असता, ही गोष्ट वेगळी... काही कामानिमित्त अशाच काही महिला आपल्या मूळच्या गावी आल्या होत्या. ते काहींचे माहेर, काहींचे सासर, तर एखादीचे सासर आणि माहेरही! त्यामुळे गप्पांचा सूर ‘नदीच्या पल्याड बाई झाडी लई दाट तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट...’ असा सारा गदगद झालेला. त्यांनी पाहिलेलं, अनुभवलेलं गाव आता स्वाभाविकच तसं राहिलं नव्हतं. पण त्यांच्या आठवणीत तेच जुनं चित्र असणं स्...

नको नकोसा ‘विक्रम’ टळला

भारत व दक्षिण आफ्रिका संघांकडून ऐतिहासिक विक्रम टळला. एकाच दिवशी सर्वाधिक गडी बाद होण्याचा पराक्रम. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड ह्यांच्यामध्ये  झालेल्या १९०२च्या  मेलबर्न कसोटीत पहिल्याच दिवशी २५ गडी बाद झाले होते. गोलंदाजांनी जणू खिशात घेऊन फिरावी अशा खेळपट्टीवर झालेल्या काही कसोटी सामन्यांवर दृष्टिक्षेप...   ---------------- महंमद सिराज...स्वप्नवत मारा. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सहा बळी. (छायाचित्र सौजन्य आयसीसी) ..................................................... नवं वर्ष आणि नव्या (नकोशा) ‘विक्रमा’चा भोज्जा गाठण्यापासून भारत-दक्षिण आफ्रिका ह्यांना लांबच राहावं लागलं. कोणत्याही कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघांचे पहिले डाव संपण्याचा हा विक्रम. एकाच दिवशी सर्वाधिक गडी बाद होण्याचा पराक्रम. काही फलंदाजांसाठी तर एकाच दिवसांत दोन वेळा बाद होण्याची नामुष्की. केपटाऊनच्या द न्यूलँड्सच्या स्टेडियमची खेळपट्टी खिशात घेऊन जगभर फिरावं, असं बुधवारी (दि. ३ जानेवारी २०२४) काहींना वाटलं असेल. त्यात महंमद सिराज, कगिसो रबाडा, लुंगी इनगीडी, नांद्रे बर्गर, जसप्रीत बुमराह, मुकेशकुम...
html