मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

कसोटी-मालिका लेबलसह पोस्ट दाखवत आहे

दोन रजत कमळांचा ‘अभिजात’ मानकरी ‘अभिजित’

अभिजित दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा... ----------------------------------- ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना ? की ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे बोलायला मिळणं आनंददायक ? ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय ? तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत. ... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच ! कूल... नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे. खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे ! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश मिळ...

ओह! लॉर्ड्स... 😭😭

  महंमद सिराज... प्रतिकाराला पूर्णविराम. अडवूनही चेंडू यष्ट्यांवर जाऊन आदळलाच. .................... सनसनाटी म्हणता येईल असा झाला तिसरा कसोटी सामना. त्यातल्या प्रत्येक दिवसाचा रंग वेगळा होता. आशा दाखविणारा आणि निराश करणाराही. रवींद्र जाडेजा ह्यानं झुंजार खेळ करूनही भारत विजयापासून लांब राहिला. त्याची   कारणं  बरीच. पहिल्या डावात आघाडी मिळविण्याची गमावलेली संधी, दुसऱ्या डावात इंग्लंडला दिलेला बाईज धावांचा बोनस आणि आघाडीच्या फळीनं केलेली ढिसाळ फलंदाजी... .................... लॉर्ड्सच्या  मैदानावर विजयी पताका फडकवण्याची संधी गमावली. अँडरसन-तेंडुलकर करंडक कसोटी मालिकेत २-१ आघाडी मिळविण्याचीही संधी निसटली. कसोटी सामन्यांचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या सामन्यात भारत हरला. पाहता पाहता विजय दूर होत गेला. हळहळ वाटायला लावणारा हा पराभव. ‘सनसनाटी!’ ह्या सामन्याला असं विशेषण लावता येईल. त्याला रंगतदार म्हणता येईलच. पाचही दिवस चुरशीचा खेळ झाला. प्रत्येक दिवसातल्या सत्रागणीक पारडं हलकं नि जड होत राहिलं - कधी पाहुण्यांचं, तर कधी यजमानांचं. पण जखमी असूनही संघाची गरज म्हणून सहा षट्कं टाक...

नवा नेता, नवा इतिहास

सामना अनिर्णीत राखणं, एवढंच मर्यादित उद्दिष्ट बेन स्टोक्स आणि त्याच्या सहकाऱ्यांपुढे पाचव्या दिवसासाठी होतं. पावसानं हजेरी लावल्यानंतरही इंग्लंडला पराभव टाळता आला नाही. दुसऱ्या कसोटीत दणदणीत विजय मिळवून भारतीय संघानं एजबॅस्टनवर नवीन इतिहास लिहिला. कर्णधार शुभमन गिल, आकाशदीप, सिराज, जाडेजा, सुंदर हे त्याचे शिल्पकार होत! .................... ......... ......... सामन्याचा मानकरी तो ठरला असला, तरी त्या पदकावर आणि शाम्पेनच्या बाटलीवर ह्यानंही अधिकार सांगितला होताच की! ------------------------------ सामना जवळपास पाच दिवस चालला. धावा निघाल्या सतराशेच्या आसपास. दोन्ही संघांचे मिळून ३६ गडी बाद झाले. म्हणजे रोज सरासरी तीनशेहून अधिक धावा आणि पाच गडीही बाद. एकूण शतकं चार आणि अर्धशतकं सहा. सामन्यात १० बळी घेणारा एक गोलंदाज आणि डावात पाच वा अधिक गडी बाद करणारे त्याच्यासह दोघं. आणि सामन्याचा निकाल लागलेला. दणदणीत म्हणावा असा विजय पाहुण्या संघानं यजमानांवर मिळवला. आठवड्यापूर्वीच्या पराभवाची साभार नि सहर्ष परतफेड! एजबॅस्टन, बर्मिंगहॅम इथे झालेल्या भारत व इंग्लंड संघांमधील दुसऱ्या कसोटी सामन्याची ह...