अभिजित दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा... ----------------------------------- ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना ? की ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे बोलायला मिळणं आनंददायक ? ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय ? तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत. ... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच ! कूल... नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे. खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे ! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश मिळ...
अजित वाडेकर यांची कधी भेट होईल , हे स्वप्नातही आलं नव्हतं. तसं स्वप्नही पाहिलंही नव्हतं. पण भेट होणं , त्यांच्याशी दोन-पाच मिनिटं बोलणं माझ्या नशिबात सटवाईनं लिहून ठेवलेलं होतं. ज्यासाठी गेलो ती मुलाखत मिळाली नाही; पण संवाद झाला. तीच ही मर्मबंधातली ठेव. ..................... स्वातंत्र्यदिन संपता संपता रात्री उशिरा बातमी कळली - अजित वाडेकर गेले. ते त्या अर्थाने माझ्या पिढीचे नायक क्रिकेटपटू नाहीत. आवडीनं क्रिकेट पाहायला - म्हणजे आकाशवाणीवरची कॉमेंटरी ऐकायला नि वृत्तपत्रांतल्या बातम्या वाचायला शिकलो , तेव्हा वाडेकर खेळत नव्हते. कॉमेंटरीमधले धावांचे आकडे सोडले , तर बाकी काही कळायचं नाही, तेव्हाची गोष्ट सांगतोय. तर वाडेकरांनी तेव्हा निवृत्ती जाहीर केली होती. अगदी नुकतीच. इंग्लंडचा ‘ तो ’ दौरा संपला होता. सर्व बाद ४२ असा ‘ पराक्रम ’ भारताच्या नावावर नोंदला गेला तो ह्याच कुप्रसिद्ध दौऱ्यात. वाडेकर-बेदी वाद सुरू झाले म्हणतात , ते ह्याच दौऱ्यात. बरंच वाईट लिहिलं जात होतं, ते ह्याच दौऱ्याबद्दल. बॅटच्या स्वरूपातील विजय स्तंभावर दगडफे...