अभिजित दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा... ----------------------------------- ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना ? की ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे बोलायला मिळणं आनंददायक ? ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय ? तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत. ... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच ! कूल... नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे. खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे ! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश मिळ...
अशी फुललेली, गुबगुबीत इडली असावी. साथीला सांबार आणि चटणी. ( छायाचित्र सौजन्य : सी. एन. एन.) --------------------------- फ क्त नऊ शब्द. त्यांनी गेल्या पंधरवड्यात वादळ उठवलं. शब्दयुद्धच सुरू झालं. त्यात अनेक जण हिरिरीने उतरले. लेखण्या परजून नि कळफलक साफ करून. बरेच जण विरोधात, थोडे काही बाजूनं आणि काही जण कडेनं मजा बघणारे. हे योद्धे भारतातले, इंग्लंडमधले, अमेरिकेतले आणि इतर बऱ्याच देशांतले. त्यांच्या लिहिण्यामध्ये चेव होता, आवेश होता, मस्करी होती, हलक्याफुलक्या टिप्पण्या होत्या. मुद्दे होते, गुद्दे होते, पाल्हाळ होतं. खिल्ली उडवण्यासाठी, तिरकसपणे व्यक्त होण्यासाठी नवी पिढी वापरत असलेले ' मीम्स ' ही दिसले. ते नऊ शब्द ट्विटर, फेसबुक, क्वोरा अशा सामाजिक माध्यमांतून गाजले. वृत्तपत्रांनी त्याची दखल घेतली. ' न्यूज पोर्टल ' , संकेतस्थळं इथेही त्याचे पडसाद उमटले. बी. बी. सी. आणि सी. एन. एन. ह्यांनाही ह्याची आवर्जून नोंद घ्यावी, असं वाटलं. अमेरिकी अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूकही त्यात हळूच आली. तसंही राजकारण आणि ' खाणं ' ह्यांचा निकटचा संबंध असतोच की ! इंग्लंडच्या न्...