भुवनेश्वरकुमार - सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य ः आयसीसी) ----------------------- भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी. नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली...
( शीर्षस्थ टिपा : १ - अधिक स्पष्टीकरणासाठी कोणत्याही लेख-कथा-कादंबरीच्या तळाला टिपा देण्याची पंरपरा आहे. तथापि सोशल मीडियाचं ब्रीदच ‘ जुने जाऊ द्या मरणालागुनि ’ असल्यानं त्याला जागत वरतीच टिपा देत आहोत. २ - या कथेतील पात्रं, प्रसंग आणि राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा, मनोरंजन आदी कुठल्याही क्षेत्रातील घडामोडी यांचा वास्तवाशी काडीचा संबंध नाही. तसा तो वाटल्यास योगायोग समजावा. न वाटल्यास कपिलाषष्ठीचा योग समजावा ! ३ - कथेतील पात्रांना काही तरी नावं असावीत म्हणून ती दिली आहेत. अर्थातच, ‘ नावं ठेवणं ’ या आपल्या परंपरेला जागून ही नावं दिली गेली आहेत. ) -------- थोडीथिडकी नाही, तब्बल चार वर्षं होऊन गेली त्याला आता. आमच्या ग्रूपसाठी ‘ अच्छे दिन ’ आले होते. सच्चे दिन, अच्छे दिन ! ग्रूप म्हणजे आमचा गटबिट नाही हो. नो गटबाजी तसली. आम्हाला ‘ अच्छे दिन ’ येण्याचं कारण निवडणुका, राजकारण, सातवा वेतन आयोग, सेन्सेक्सची मुसंडी असलं काही भौतिक किंवा ईहवादी नव्हतं. ढेप्यानं आणले होते हे अच्छे दिन आमच्यासाठी. त्याच्या जोडीला होती नमूताई. ढेप्या आणि नमूताईनं मिळून मित्र-मैत्रिण...