मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

विश्वचषक2025 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

दोन रजत कमळांचा ‘अभिजात’ मानकरी ‘अभिजित’

अभिजित दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा... ----------------------------------- ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना ? की ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे बोलायला मिळणं आनंददायक ? ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय ? तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत. ... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच ! कूल... नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे. खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे ! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश मिळ...

पोरी... खेळणाऱ्या, जिंकणाऱ्या!

ह्या विजयानं अनेक गोष्टी बदलतील.  बऱ्याच बदलांची नांदी झाली आहे. काही छोट्या गावांमधून नवी गुणवत्ता पाहायला मिळेल. मुलींना अंग चोरून मुलांच्या ॲकॅडमीमध्ये सराव करावा लागणार नाही. मुलींच्या आय. पी. एल. स्पर्धेच्या प्रेक्षकांमध्ये आणि टीव्ही.वर ती पाहणाऱ्यांमध्ये  किती तरी पटीने वाढ होईल  ...महत्त्वाचं म्हणजे लक्षावधी क्रिकेटवेड्यांना रणरागिणी, दुर्गा सापडल्या आहेत ! ------------------------ ‘ नंबर वन ’ ठरलेल्या संघाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांना वेगळी भेट. संघातील सर्व खेळाडूंच्या सह्या असलेली ‘ नमो १ ’ जर्सी सहर्ष, साभिमान सादर. (छायाचित्र सौजन्य - https://www.pmindia.gov.in/ ) .............................. महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामने टीव्ही.वर चालू असताना दोन षट्कांमध्ये हमखास एक जाहिरात पाहावी लागे. त्यात दिसायचा गोंधळलेला तरुण – अरे, महिला क्रिकेटपटूंची नावं असलेला तो प्रसिद्ध निळा टी-शर्ट आपण (पुरुष असल्याने ! ) कसा घालायचा बुवा ? काही तरीच हं...   मनात अशी शंका असलेल्या त्या तरुणाला पाच-दहा मिनिटांच्या प्रवासात बरंच काही द...