अभिजित दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा... ----------------------------------- ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना ? की ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे बोलायला मिळणं आनंददायक ? ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय ? तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत. ... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच ! कूल... नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे. खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे ! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश मिळ...
एक फोन आणि सुन्न करणारी कहाणी अचानक एखाद्या जुन्या मित्राची फाऽऽर आठवण येते. त्यानं पोटापाण्यासाठी गाव/शहर सोडलेलं असतं. त्या दूर देशी तो स्थायिक झालेला असतो. अधूनमधून वर्गमित्र भेटतात. गप्पा होतात; खळखळून हसतो, तेव्हाही त्याची आठवण होते. त्याचं कसं चाललंय, मुलं काय करतात, ह्याची एकमेकांकडं विचारपूस होते. बस तेवढंच! कधी तरी कुठल्या कामासाठी जाताना त्या भागातलं त्याचं घर दिसतं रस्त्यावरून. कुणीच राहात नसतं. त्या बंद घराकडे पाहून पुन्हा आठवतो तो दोन-चार मिनिटांसाठी. कामात गुंतल्यावर त्याची सय मनातल्या तळघरात जाते आपसूक. अध्येमध्ये मित्राची गोष्ट कळते दुसऱ्या मित्राकडून, त्याच्या दूरच्या नातेवाइकाकडून. छान चाललेलं असतं. समाधानाची दोन उद्गारचिन्हं उमटवून वळतो आपल्या व्यापाकडे. असंच कधी कधी त्याची आठवण टकटक करून जाते मनाच्या दारावर. ‘बोलू नंतर’, ‘शोधू नंबर’… आळस करतो थोडा. आजच्यासारखा एखादा दिवस, त्याची कातर संध्याकाळ येते. खूपच आठवण येते मित्राची. कारण काहीच नसतं; पण बोलावं वाटतं. पण संपर्क साधणार कसा त्याच्याशी? पत्ता नाही, फोन नंबर नाही, इ-मेल आयडी माहीतच नाही… बोलायचं तर आहेच. अचानक लक...