भुवनेश्वरकुमार - सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य ः आयसीसी) ----------------------- भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी. नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली...
घाई पोस्ट करण्या पटापट फेसबुकावरी सुरू झटापट ट्विटरवरीही चिवचिवाट ...पाऊस कोसळू लागतो जेव्हा। झारा घेऊनि कळ्या पाडिती लाडू गोड शब्दांचे वळिती कविता कविता तयां म्हणिती ...पाऊस कोसळू लागतो जेव्हा। चिंब चिंब साऱ्या ‘भिंती’ अवघे एकमेकां ‘लाईकती’ आणिक ‘कमेंटा’ही बरसती ...पाऊस कोसळू लागतो जेव्हा। खमंग बटाटवडा नि चिवडा पाहा कुर्रुमकुर्रुम कांदाभजी ! अहाहा! ! कपात वाफाळता आल्याचा चहा ...पाऊस कोसळू लागतो जेव्हा। गाऊही लागते ‘आकाशवाणी’ मनात दडलेली पाऊसगाणी फिरुनी जाग्या साऱ्या आठवणी ...पाऊस कोसळू लागतो जेव्हा। वर्षासहलींचे आखले जातात बेत आंबोली, भुशी डॅम, भंडारदरा थेट जिवाच्या जिवलगांची तिथेच भेट ...पाऊस कोसळू लागतो जेव्हा। डबकी रस्त्यात साचतात लेकरे खट्याळ नाचतात कागदी नावा तिथेच बुडतात ...पाऊस कोसळू लागतो जेव्हा। कोठे कोठे कोसळती झाडे खचून जाई भिंत, पत्राही उडे गरिबांचे पडती संसार उघडे ...पाऊस कोसळू लागतो जेव्हा। घोटभर पाण्यासाठी किती श्रम थकले पाय, कोंडून गेला दम मिळेल त्यांना थोडासा आराम ...पाऊस कोसळू लागतो जेव्हा। ओढे खळाळती, नद्याही वाहती नव...