मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भुवीचे पुनरागमन, जर्सी नंबर ७८

भुवनेश्वरकुमार - सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य ः आयसीसी) ----------------------- भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी. नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली...

‘चित्रमय’ आठवणी

चित्र ‘साधं’ आहे. एका चतकोर कार्डशीटवर पॉइंट पेनाने केलेलं रेखाटण. त्यात दिसते सफाई. रेषांची गुंतागुंतही. ह्या विलक्षण मिश्रणातून आकाराला आलं आहे एक डेरेदार झाड... श्रीरंग उमराणी ह्यांचं रेखाटण. हे चित्र ‘साधं’ आहे. एका चतकोर कार्डशीटवर पॉइंट पेनाने केलेलं रेखाटण. त्यात सफाई आहे. रेषांची गुंतागुंत दिसते. ही सारी सफाई आणि गुंतागुंत ह्या मिश्रणातून आकारला आलं आहे एक डेरेदार झाड. फार उंच नाही. पण आडवं वाढलेलं. अभ्यासकांना, दर्दी मंडळींना आणि जाणकारांना ह्या चित्रात विशेष काही वाटणार नाही  कदाचीत . पण आधी ‘साधं चित्र’ म्हटलं असलं, तरी ते माझ्यासाठी फार ‘स्पेशल’ आहे.  चित्रकलेच्या बाबत ‘नर्मदेतला गोटा’ असूनही ते जवळपास चार दशकं जपून ठेवलेलं. ते पाहिलं की, अजूनही छान वाटतं. जुन्या आठवणी फिरून जाग्या होतात. हे चित्र आधी एका वहीवर डकवलेलं होतं. कधी तरी तिथून ते काढून व्यवस्थित ठेवलं. जेव्हा केव्हा ते पाहतो, तेव्हा त्याबद्दल लिहायचं ठरवतो. पण राहून जातं. खरं तर ते छान ‘स्कॅन’ करून इथं द्यायचं होतं. पण ते जमेना. म्हणून मोबाईलवरच त्याचं छायाचित्र काढलं. चित्राच्या उजव्या कोपऱ्यात तळाला स...

गिलचा चौकार गेला तरी कोठे?

१४ ऑक्टोबर २०२३. विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामना . शुभमन गिलचा वादग्रस्त चौकार त्याला सगळे मुक्या स्कोअरर म्हणायचे...हंपायरप्रमाणंच तो स्कोअरर एकदम महत्त्वाचा असतोय हे गल्लीतल्या बिट्ट्या पोरांनाही माहीत असणार. आपल्या टीमचा स्कोअरर जादा रना लावणार आणि विरुद्ध टीमचा कमी. म्हणजे आपण बॅटिंग करत असलो तर. त्यातून शेवटी सणसणीत मारामाऱ्या होणार हे नक्कीच. मॅच समाप्त. ‘‘सबंध गावात प्रामाणिक स्कोअरर म्हणजे एकच. मुक्या स्कोअरर.’’ असं सगळीच पोरं म्हणतात. - ‘झुंबर’मध्ये लंपन अचूक स्कोअरिंगचं महत्त्व सांगत असतो. ते करणाऱ्याबद्दल त्याच्या मनात अतीव आदर आहे.  डेंगीच्या डासांनी चावा घेतल्यामुळं शुभमन गिल ह्याला मैदानापासून लांब राहावं लागलं. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या तेराव्या अध्यायातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याला खेळता आलं नाही. ‘अंतिम सामना नाही; पण त्याहून किंचितही उणा नाही’, असं वर्णन केलं जातं तो भारत-पाकिस्तान सामना शनिवारी (१४ ऑक्टोबर) अहमदाबादेत झाला. एक दिवशीय क्रिकेटच्या विश्वचषकात आठव्या वेळी हे संघ समोरासमोर उभे ठाकले होते. झुंज झालीच नाही. ८-० की ७-१ ही उत्सुकता पहिल्या डावा...

‘सप्तपदी’नंतर आवृत्ती आठवी

  ‘विश्वचषकात भारताकडून पाकिस्तानचा पराभव ही विश्वातली अटळ  गोष्ट आहे,’ अशी  मार्मिक टिप्पणी ‘मिरर’ ह्या इंग्लंडमधील  दैनिकानं  मागच्या स्पर्धेच्या वेळी केली.  त्याच अटळ गोष्टीची  अहमदाबामध्ये पुनरावृत्ती होईल, असं कोट्यवधी  क्रिकेटरसिकांना  वाटतंय. अहमदाबादमध्ये  शनिवारी होणाऱ्या  लढतीनिमित्त विश्वचषकातील भारताच्या ‘सप्तपदी’ची झलक.   ---------------------------------------------------- गोष्ट आहे सहा वर्षांपूर्वीची. म्हणजे १८ जून २०१७ रोजीची. इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडकाची अंतिम लढत होती. त्यासाठी समोरासमोर उभे ठाकले होते कट्टर प्रतिस्पर्धी – भारत आणि पाकिस्तान. टीव्ही. वाहिन्यांचा प्रेक्षकवर्ग वाढतो, जाहिरातींचा महसूल वाढतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या गल्ल्यात भर पडते, तिकिटांचा काळा बाजार होतो आणि सट्टाबाजार गरम होतो, अशी ही लढत. ‘बीबीसी’च्या हिंदी सेवेमध्ये दीर्घ काळ काम केलेल्या विजय राणा यांनी त्या लढतीच्या आदल्या दिवशी ‘फेसबुक’वर पोस्ट टाकली होती – ‘Indian media can’t differentiate between cricket and war.’ हाच मज...

धावांच्या पावसात धडाडलेली तोफ

  विश्वचषकातील सर्वोत्तम -  ७ (ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड - २०१५) स्पर्धेत एकूण शतकं झाली ३८. प्रत्येक अडीच डावांमागं एक तरी शतक. अर्धशतकांची संख्या होती १११. तीन डावांमध्ये संघाची धावसंख्या चारशेच्या पलीकडं गेली. स्पर्धेतील २८ डावांमध्ये संघाची धावसंख्या तीनशेचा टप्पा ओलांडून गेलेली. प्रत्येक सामन्यात किमान १० षट्कार ठोकलेले. स्पर्धा फलंदाजांची, फलंदाजांसाठीच होती जणू. ...तरीही विश्वचषकातील सर्वोत्तम ठरला एक गोलंदाज - मिचेल स्टार्क! अंतिम सामना. मॅककलम बाद. मिचेल स्टार्कच्या इनस्विंगरवर मॅककलमची दांडी गुल. (छायाचित्र सौजन्य : www.cricket.com.au) ............................................................................... अंतिम सामना झाला. अकराव्या विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचं पारितोषिक जाहीर झालं. पत्रकारांना आणि समीक्षकांना नवल वाटत होतं. अर्थात त्यात कौतुकाचा भाग जास्त होता. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम ठरला होता. त्याच्या क्षमतेबद्दल कुणाला शंका नव्हती. त्याची स्पर्धेतली कामगिरी ह्या पारितोषिकाला साजेशी अश...

कळणे आणि वळणे - फोटो आणि कविता

  साधारण दोन वर्षांपूर्वी एक छायाचित्र मोबाईलमध्ये टिपलं आणि ते पाहताना काही ओळी सुचल्या. कवितेसारख्या... तसंच आज झालं. आता रात्री ते पाहताना पुन्हा काही लिहावं वाटलं. मग ‘एक फोटो आणि एक कविता’ मालिकेत भर टाकावी म्हटलं. हा तो अध्याय क्रमांक दोन... ------------- कुठून कसे पडले बीज आणि कसे अंकुरले कळले नाही तहान भागविण्यासाठी कुठून कसे पाणी घेतले कळले नाही बंद वाड्याच्या दाराशी, रस्त्याच्या कडेला कसे तगून राहते कळले नाही येणाऱ्या-जाणाऱ्यांचा लत्ताप्रहार कसा काय सोसत राहते कळले नाही वाहनांचा काळाकुट्ट धूर फुफ्फुसात कसे भरून घेते कळले नाही पान-तंबाखू-गुटक्याच्या पिचकाऱ्या नित्य साहते कसे तेही कळले नाही आहे किती दिवस अजुनी आयुष्य त्याचे हिरवेगार कळले नाही . . . . मिळेल तेवढे हसत जगावे, संधी साधून फुलत राहावे, पालवीला मिरवत हसावे बरीक त्याला वळले, एवढे मात्र कळले! ----------- (दि. १ ऑक्टोबर २०२३) ...........
html