सोमवार, २ ऑक्टोबर, २०२३

एक फोटो आणि एक कविता (२))

 


साधारण दोन वर्षांपूर्वी एक छायाचित्र मोबाईलमध्ये टिपलं आणि ते पाहताना काही ओळी सुचल्या. कवितेसारख्या...

तसंच आज झालं. आता रात्री ते पाहताना पुन्हा काही लिहावं वाटलं. मग ‘एक फोटो आणि एक कविता’ मालिकेत भर टाकावी म्हटलं. हा तो अध्याय क्रमांक दोन...


कळणे आणि वळणे
-----------------------

कुठून कसे पडले बीज
आणि कसे अंकुरले
कळले नाही

तहान भागविण्यासाठी
कुठून कसे पाणी घेतले
कळले नाही

बंद वाड्याच्या दाराशी, रस्त्याच्या कडेला
कसे तगून राहते
कळले नाही

येणाऱ्या-जाणाऱ्यांचा लत्ताप्रहार
कसा काय सोसत राहते
कळले नाही

वाहनांचा काळाकुट्ट धूर
फुफ्फुसात कसे भरून घेते
कळले नाही

पान-तंबाखू-गुटक्याच्या
पिचकाऱ्या नित्य साहते कसे
तेही कळले नाही

किती दिवस आहे अजुनी
आयुष्य त्याचे हिरवेगार
कळले नाही
.
.
.
.
मिळेल तेवढे हसत जगावे,
संधी साधून फुलत राहावे,
पालवीला मिरवत हसावे
बरीक त्याला वळले, एवढे मात्र कळले!
-------------
(दि. १ ऑक्टोबर २०२३)
...........
#पद्यासारखं_गद्य #कविता #फोटो #एक_फोटो_आणि_एक_कविता


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पोरी... खेळणाऱ्या, जिंकणाऱ्या!

  ह्या विजयानं अनेक गोष्टी बदलतील.  बऱ्याच बदलांची नांदी झाली आहे. काही छोट्या गावांमधून नवी गुणवत्ता पाहायला मिळेल. मुलींना अंग चोरून मुलां...