भुवनेश्वरकुमार - सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य ः आयसीसी) ----------------------- भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी. नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली...
धनेश बोगावत : नगरच्या संस्कृतीचा चालताबोलता इतिहास ही प्रसन्न छबी सावंतवाडीजवळच्या घाटातली. आम्ही असंच एकदा बेळगावला गेलो होतो तेव्हाची.. ------------------------------------ ‘ आपण एकदा मुंबईला जाऊ. काळबादेवीला तुला रीअल गुज्जू फूड खाऊ घालतो.’ ‘चल, राजस्थानात चल माझ्याबरोबर. तिथलं लोकसंगीत ऐकवतो. मस्त चार दिवस फिरून येऊ.’ ‘संध्याकाळी ये रे एकदा. आपण नगरच्या सगळ्या बायपासवरून फिरून येऊ. काय दिसतं माहितीय नगर तुला...’ ‘अरे! काय कौतुक लावलंय त्या इंदूरच्या पोह्याचं. त्यात निम्मी तर साखर ओतलेली असते.’ ‘दिवसभर तेच ऐकतोय रे. तूही ऐक. थांब तुला केनी रॉजर्सची गाणी पाठवतो.’ ‘ते गाणं ना? एकसाथ ४२ व्हायोलीन वाजतात. काय धडपड केली असेल...’ ‘नाताळच्या सणात कॅरोल गातात ना; ते ऐकायला मिळतं बघ त्याच्या गाण्यांमध्ये.’ ‘टीव्ही. लावला आणि टेबल टेनिस बघत बसलो. काय खेळतात ती पोरं... आहाहा!’ ... ही आणि अशी आमंत्रणं, ठाम मतं नि ठाशीव विधानं प्रसंगानुसार आणि मूडनुसार ऐकायला मिळतात. ती ज्या मुखातून बाहेर पडतात त्याचा मालक एकच असतो. स्थळ बदलतं असतं. कधी समोरासमोर बसून हे ऐकवलं जातं, कधी फोनवरून. त्या आवाजा...