मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

अरविंद-केजरीवाल लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भुवीचे पुनरागमन, जर्सी नंबर ७८

भुवनेश्वरकुमार - सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य ः आयसीसी) ----------------------- भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी. नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली...

२% मतांच्या फरकाने दुप्पट जागा! दिल्लीत भाजपचा वनवास कसा संपला?

दिल्लीतील वनवास संपल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा जल्लोष. (छायाचित्र सौजन्य - ‘ए. पी.’) ........... दिल्लीचे एकूण राजकारण पाहता विधानसभेची २०२५ची निवडणूक जिंकणे भा. ज. प.साठी फार महत्त्वाचे होते. 'दिल्ली दूर राहिली' ही खंत संपली. हा विजय सफाईदार नाही हे सांगण्यासाठी मताच्या टक्केवारीचा आधार घेतला जातो. अंकगणिती भाबडेपणा सोडला, तर आकडे हेच सांगतात की, सगळ्याच पक्षांचा काही ठिकाणी फायदा आणि काही ठिकाणी नुकसान झाले. ----------------- भारतीय जनता पक्षाचा राजधानी दिल्लीतला दोन वेळचा वनवास संपला! नायब राज्यपालांच्या हाती अनेक अधिकार असलेल्या ह्या राज्याची सत्ता २७-२८ वर्षांनी ह्या पक्षाकडे आली. केंद्रात आपले सरकार, अनेक राज्यांमध्ये सत्ता आणि दिल्ली मात्र दूर... ही कार्यकर्त्यांची, पक्षाच्या नेतृत्वाची खंत दूर झाली असेल फेब्रुवारी २०२५च्या निवडणुकीतील विजयामुळे. लोकसभेच्या सलग तीन निवडणुकांमध्ये राजधानीतल्या सर्वच्या सर्व जागा जिंकूनही विधानसभा मात्र भा. ज. प.ला हुलकावणीच देत राहिली. नाही म्हणायला २०१३च्या निवडणुकीत हर्षवर्धन ह्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने ३२ जागांपर्यंत मजल मारली हो...
html