अभिजित दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा... ----------------------------------- ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना ? की ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे बोलायला मिळणं आनंददायक ? ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय ? तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत. ... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच ! कूल... नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे. खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे ! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश मिळ...
अभिजित
दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा...
-----------------------------------
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा...
-----------------------------------
‘ॲवॉर्ड’विजेती कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना?
की ‘ॲवॉर्ड’विजेती कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे
बोलायला मिळणं आनंददायक?
ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय?
तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत.
... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची
कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच!
कूल...
नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे.
खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या
यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे
छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश
मिळवलं.
पहिलं रजत कमळ ‘कुंकुमार्चन’मुळे
आधी ‘कुंकुमार्चन’ लघुपटासाठी.
कौटुंबिक मूल्ये सांगणाऱ्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणून अभिजितची
निवड झाली. पहिलं रजत कमळ.
त्यानंतरचं दुसरं रजत कमळ फुललं ते ‘हमसफर’च्या माध्यमातून. एकतानगर, केवडिया (गुजरात) येथे झालेल्या शानदार
समारंभात अभिजितने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्यांच्या हस्ते हा राष्ट्रीय
पुरस्कार स्वीकारला. सर्वोत्कृष्ट लघुपटासाठीचे रजत कमळ!
पुरस्कारांची घोषणा झाली, त्याच रात्री अभिजितच्या बाबांनी (श्री.
अरविंद दळवी) ही बातमी कळवली. आता त्याला भेटलंच पाहिजे, असं मनात आलं. ह्याचं
आणखी एक कारण म्हणजे धाकटा मित्र (😊) प्रणीत मेढे त्याच्याबद्दल भरभरून बोलत असतो.
त्यानंही आमची मुलाखत घडवून आणण्याचा वायदा केलेला. त्याच्या ह्या दोन्ही लघुपटाची
निर्मिती श्री. नरेंद्र फिरोदिया ह्यांची, म्हणजे ‘अनुष्का मोशन पिक्चर्स
अँड एंटरटेन्मेंट’ची. ही
झळाळती रुपेरी कामगिरी अभिजितची आणि ‘अनुष्का’चीही.
ठरल्याप्रमाणे अभिजितच्या घरी भेट झाली. भरपूर वेळ गप्पा झाल्या.
त्यातून त्याच्या आजवरच्या प्रवासाबद्दल बरंच काही कळलं. ‘‘हमसफर’ पूर्ण झाला. ह्यालाही राष्ट्रीय पुरस्कार
मिळेल, अशी काही आशा-अपेक्षा होती का?’
अभिजित किंचित थांबतो आणि मग सांगतो. त्याच्या त्या थांबण्यात तो ‘खरं
वाटणारं’ उत्तर शोधत नसतो. म्हणाला, ‘‘सिनेमा
बनवणं, हे आता प्रेम झालं आहे. मूळ ते. पूर्ण झाल्यावर वाटलं की, पारितोषिकाच्या
शर्यतीत असेल म्हणून. पण तो तयार करणं महत्त्वाचं.’’
रेडिओ आहे ‘हमसफर’चा नायक
‘आपली पात्रं खूप बोलत असतात,’ हे निरीक्षण (किंवा
मत) सांगून तो म्हणाला, ‘‘मला हा लघुपट संवादाविना बनवायचा
होता. त्यातून एक जोरदार संदेश द्यायचा होता. हा प्रयोग अतिशय सहज, नैसर्गिक,
वास्तववादी वाटावा – फिल्म पूर्ण ऑर्गॅनिक असावी – हा माझा ध्यास होता. इतकं नैसर्गिक
की, त्याची गोष्टच बोलली पाहिजे.’’
मध्यमवर्गीय घराघरांत महत्त्वाच्या जागी असलेला रेडिओ अडगळीत गेला तो
वॉकमनच्या आगमनानंतर. हे घडलं साधारण १९९०च्या दशकात. अभिजितला आजोबा म्हटले की,
रेडिओच आठवतो. त्यांचं अभिन्न अंग असल्यासारखा. त्यांचं ते सतत ऐकणं. लहानपणी
बेलवंडीला गेल्यावर अभिजितनं एकदा त्यांचा रेडिओ लपवून ठेवला. आजोबांची गंमत
करायची म्हणून. त्यांची प्रतिक्रिया काय, हे पाहण्यासाठी.
पडद्याआड गेलेला रेडिओ पडद्यावर
‘तो पूर्ण दिवस आजोबा अस्वस्थ होते. काही तरी गमावल्याची त्यांची भावना होती. अर्थात ती मला तेव्हा नाही, आज कळतेय,’ अभिजित म्हणाला. ही आठवण त्याने जपली. पडद्याआड गेलेल्या रेडिओला त्यानं मोठ्या दिमाखात पडद्यावर आणलं, नायक म्हणूनच!
‘तो पूर्ण दिवस आजोबा अस्वस्थ होते. काही तरी गमावल्याची त्यांची भावना होती. अर्थात ती मला तेव्हा नाही, आज कळतेय,’ अभिजित म्हणाला. ही आठवण त्याने जपली. पडद्याआड गेलेल्या रेडिओला त्यानं मोठ्या दिमाखात पडद्यावर आणलं, नायक म्हणूनच!
चित्रपट डोळ्यांत भरतो, तो पुरस्कार जाहीर झाल्यावर. तो खरा घडत असतो
किंवा बिघडत असतो निर्मिती करताना. अभिजित म्हणाला, ‘‘ही प्रक्रिया फार मोठी आहे. दिग्दर्शक म्हणून ‘हमसफर’ जेवढा माझा आहे, तेवढाच तो प्रॉडक्शन विभागाचाही आहे. आमच्या सगळ्यांचा
तो एकत्रित प्रयत्न आहे. त्याच्या यशाचा आनंद नक्कीच मोठा.’’
‘हमसफर’ची अनेक वैशिष्ट्यं अभिजित सांगतो. ज्येष्ठ
अभिनेते विजय पाटकर ह्यांनी त्यात प्रमुख भूमिका साकारली आहे. त्यांचा हा पहिलाच
लघुपट. अभिजितनं दिग्दर्शनाप्रमाणे लेखनाचीही जबाबदारी पार पाडली आहे. पूर्ण चित्रीकरण
अहिल्यानगरमध्ये झालेला हा लघुपट.
नॉस्टाल्जिया आपल्याला एकूण आवडतो. म्हणूनच की काय, पण ‘हमसफर’ने जाईल तेथे ठसा उमटवला. नाणं खणखणीत वाजवलं. मुंबई इंटरनॅशनल फिल्म
फेस्टिव्हलमध्ये त्याला सगळीच पारितोषिकं मिळाली. ह्या लघुपटाने विविध चित्रपट
महोत्सवांमध्ये धमाल केली, पारितोषिकं मिळवली.
तशी कोणतीही ठळक पार्श्वभूमी नसताना अभिजित लेखन-दिग्दर्शन ह्या ‘जोड’धंद्याकडे कसा काय ओढला गेला? आणि यशस्वीही कसा झाला? थेट नसली तरी त्याच्या ह्या कर्तृत्वशाली कामगिरीला पार्श्वभूमी आहेच. अभिजितचे
आजोबा कामगार नाट्य चळवळीशी जोडलेले. त्याच्या बाबांना वाचनाची गोडी. जयवंत दळवी,
पु. ल. देशपांडे हे त्यांचे आवडते लेखक. त्यांनी अभिजितला पुस्तकांची ओळख करून
दिली.
त्यानंतर येते ती अभिजितची आई. शाळकरी वयात त्यांनी मुलाला एकपात्री
प्रयोग, कथाकथन, नाट्यवाचन अशा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये भाग घ्यायला लावला.
त्यासाठी त्याची तयारी करून घेतली. त्यातून लक्षात येतं की, अभिजितच्या यशाचं बीज
असं फार पूर्वी पडलेलं आणि त्याला खत-पाण्याचा व्यवस्थित पुरवठा झालेला.
मला नट व्हायचं होतं
ह्या चंदेरी दुनियेत स्वप्न घेऊन येणारे बरेच. त्यातल्या अनेकांना अपेक्षित
नसलेल्या रस्त्याने जावं लागतं. तिथे त्यांना वेगळीच, खरी ठरणारी स्वप्नं भेटतात.
अभिजित त्यांच्यापैकीच एक. तो म्हणाला, ‘‘खरं तर मला नट
व्हायचं होतं. नाटकात गेलो आणि मी ‘बिघडलो’! शाळेत खूप एकपात्री प्रयोग केले. मग सतीश लोटके ह्यांनी त्यांच्या नाटकात
संधी दिली. निमित्त होतं राज्य नाट्य स्पर्धेचं. आधी माझ्या वाट्याला पाच की सहा
भूमिका होत्या. बघता बघता त्या अठरावर पोहोचल्या!’’
‘‘वक्तशीरपणा हा माझा गुण. पाठांतरही चोख. हे लोटके ह्यांच्या लक्षात आलं.
त्यांनी मग ‘हे बसवून घे’, ‘त्याच्याकडून हे करून घे’ अशी एक एक जबाबदारी
सोपवली. असं करता करता मला माझ्यातला दिग्दर्शक सापडला,’’
असं अभिजित म्हणाला.
![]() |
ते सध्या काय करतात? अभिजितचे पुरस्कार कौतुकाने पाहतात! पत्नी, बाबा, आई... ............... |
आधी नाटक आणि तिथून पुढचा टप्पा सिनेमाचा. त्यातही खास करून लघुपटाचा.
प्रसिद्ध दिग्दर्शक, पटकथा-लेखक केदार शिंदे ह्यांच्या बरोबर भरपूर काम केलं. नाटक
बसवण्यात आपल्याला मजा येतेय, असं अभिजितला वाटू लागलं.
‘वेटिंग फॉर गोदो’चा विस्तार, मराठी अवतार
सॅम्युएल बेकेट ह्यांचं ‘वेटिंग फॉर गोदो’ हे अनेकांना भुरळ घालत आलेलं. तशी ती अभिजितलाही पडली, पण वेगळ्या पद्धतीने. आपल्या वारीची पार्श्वभूमी घेऊन त्याने ‘गोदो’चा विस्तार केला - दोन अंकी ‘भेटी लागी जीवा’. लेखक म्हणून त्याला ह्या नाटकानं अधिक मान्यता दिली.
‘भेटी लागी...’ने राज्य नाट्य स्पर्धेचं व्यासपीठ
गाजवलं. मग यथावकाश ‘झी नाट्य गौरव’
सोहळ्यासाठी त्याचं नामांकन झालं. त्याची गंमत अभिजितच्या तोंडूनच ऐकण्यासारखी. तो
म्हणाला, ‘‘छान जॅकेट वगैरे मी त्या कार्यक्रमासाठी शिवून
घेतलं. नामांकन झालं, हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. ज्यांचं नामांकन होतं, त्या
सगळ्यांना ‘झी’कडून ट्रॉफीची छोटी
प्रतिकृती कार्यक्रमाआधीच भेट मिळते. तीही आली.’’
‘‘कार्यक्रमासाठी तसा सजूनच गेलो होतो. माझं हे सजणं काही जुन्या-जाणत्यांनी
ओळखलं. त्यातल्याच एका दादानं जवळ बोलावून घेतलं नि म्हणाला, ‘अभिजित, माझ्याकडे ह्या छोट्या ११ ट्रॉफी आहेत; पण खऱ्या बक्षिसाची अजून एकही नाही!’ त्याला काय सांगायचं होतं ते मला कळलं,’’ अभिजित
म्हणाला. पण बक्षिसाच्या ट्रॉफीवर त्या दिवशी अभिजितचं नाव लिहिलेलं होतं.
‘गोदो’चा असा विस्तार करताना अभिजितनं मूळ नाटक
पचवलेलं, समजून घेतलेलं होतं. गोदोची वाट पाहणारे ते दोघे आहेत. येथे वारीत आलेले
पांडुरंगाच्या शोधात आहेत. पांडुरंग शोधणं म्हणजे काय ह्याचा वेध अभिजितने घेतलेला
आहे. म्हणूनच तो बोलण्याच्या ओघात सहजपणे ‘विठोबाचा हार
तुझ्या कंठी कैसा आला’ ह्या चोखोबांच्या अभंगाची साक्ष
काढतो.
नगरमध्ये बनलेला ‘ट्रिपल सीट’
‘‘मी काही लोकांसाठी सिनेमा लिहिला. मग वाटायला लागलं, स्वतःसाठी चांगली
फिल्म करायची. आतून तसं वाटतं होतं,’’ अभिजित म्हणाला.
नगरमध्ये बनलेल्या ‘ट्रिपल सीट’ची कथा,
पटकथा, संवाद त्याचेच होते. एवढंच नाही तर ‘क्रीएटिव्ह
डिरेक्टर’ ही जबाबदारीही त्यानं पार पाडली. ह्यात काम करणारे
बहुसंख्य कलाकार रंगभूमीवरचे होते. ह्या दोन्ही माध्यमांच्या भाषांमधील फरक कदाचित
त्या दरम्यान त्याच्या लक्षात आला असावा.
कोविड महामारीची साथ आली आणि त्याच काळात चित्रपट हे माध्यम आपलं
म्हणून अभिजितने मनाशी ठरवलं. हा सारा वेळ तो चित्रपट बघत राहिला. देशातले,
विदेशातले. ऑस्कर मिळालेले, त्यासाठी नामांकित झालेले असंख्य चित्रपट एका पेन
ड्राइव्हमध्ये साठवले. ते पाहिले.
ह्याच काळात अभिजितचा रस्ता ठरला – आशयप्रधान, नैसर्गिक आणि वास्तववादी
मांडणीचा चित्रपट, हीच आपली खरी भूक आहे. समाधान मिळेल ते त्यातूनच.
पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणाऱ्या ‘कुंकुमार्चन’ने अभिजितला सिनेमाची भाषा समजली. ती वेगळी असते, हे त्याला पुरते उमगले. मूकबधिर
मुलाला आईसाठी चप्पल घ्यायची आहे आणि त्यासाठीची त्याची धडपड, अशी ही कथा.
‘मला तेव्हा नॅशनल ॲवॉर्ड वगैरे काही माहीत नव्हतं. पण वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात
ह्या लघुपटाने प्रेक्षकांना जिंकलं. वीसपेक्षा जास्त पारितोषिकं मिळवली,’
असं सांगून अभिजित म्हणाला, ‘‘त्याच निमित्ताने आशुतोष गोवारीकर
ह्यांची भेट, ओळख झाली. त्यांनी सांगितलं, ‘अरे, तुझी ‘कुंकुमार्चन’ फिल्म मी कॅनडातील फेस्टिव्हलमध्ये
पाहिली. छान झालीय रे!’
पुढे त्याला रजत कमळ मिळाले.’’
विक्रम गोखले म्हणाले - मी करणार!
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव झालेल्या ‘कालसर्प’ची कहाणी आणखी वेगळी. त्याची कथा विक्रम गोखले ह्यांना ऐकवली आणि ते म्हणाले, ‘प्रमुख भूमिका मी करणार.’ त्या पहिल्या भेटीचे, नंतर चित्रीकरणाच्या वेळचे त्यांचे अनुभव अभिजित सांगत होता. त्या अभिनेत्याच्या कामाचे, स्वभावाचे मोठेपण सांगत होता.
सिनेमाची भाषा वेगळी. मग दिग्दर्शकाची भाषा त्यात पुन्हा वेगळी असते का?
पुन्हा कॅमेरामन, रंगभूषाकार, अभिनेते... ह्यांचीही भाषा भिन्नच असते. त्याची
सांगड दिग्दर्शक कसा घालतो? ह्या सगळ्याचा आता व्यवस्थित
अभ्यास केलेला अभिजित म्हणाला, ‘‘ह्या सगळ्या भाषा, परिभाषा
भिन्न हे खरेच. पण खरं म्हणजे गोष्ट हाच आत्मा असतो. ती समजून घेऊन चित्रपट केला,
तर सगळं व्यवस्थित जमतं. भाषा नंतर येते.’’
चांगल्या चित्रपटाची व्याख्या काय असते? प्रत्येकाच्या
दृष्टिकोणातून वेगळी. मग पारितोषिकांची निवड करणाऱ्या परीक्षकांवर नेमका कशाचा
प्रभाव पडतो? दोन राष्ट्रीय आणि अनेक आंतरराष्ट्रीय
पारितोषिकांचा मानकरी बनलेल्या अभिजितला त्याचे समव्यवसायी हा प्रश्न विचारतात.
त्यांना त्यातील केमिस्ट्री जाणून घ्यायची असते, समीकरण माहीत करून घ्यायचे असते.
कथेचा आत्मा कळला पाहिजे
अभिजितकडे ह्याचे स्वच्छ, सरळ उत्तर आहे - ‘सामान्य माणसाच्या हृदयावर प्रभाव टाकते, त्याला हलवून सोडते ती गोष्ट जिंकते. खरं म्हणजे माणसाच्या मनाला स्पर्श झाला की, तो सिनेमा चांगला होतो. त्यासाठी कथेचा आत्मा कळला पाहिजे.’
गप्पांमध्ये एक जाणवलं की, अभिजित त्या त्या टप्प्यावर भेटलेल्या, मार्गदर्शन केलेल्या सगळ्यांचे ऋण मानतो. विजया मेहता यांच्या एका कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी त्याला मिळाली. त्यांनी दिग्दर्शन आणि संहिता ह्याबाबत सांगितलेले दोन नियम त्याच्या आजही लक्षात आहेत.
कथा आणि दिग्दर्शन ह्याचेही दोन प्रकार आहेत. काहींना आधी ‘दिसतं’, मग ते लिहितात. काही जण लिहितात आणि ज्यांना ‘दिसतं’ त्यांच्या हाती ते सोपवून टाकतात. सिनेमाची खरी भाषा सुमित्रा भावे,
नागराज मंजुळे ह्यांच्या चित्रपटांमुळे कळाली, असंही अभिजित सांगतो.
त्याचं म्हणणं असं की, राष्ट्रीय पुरस्कार मिळण्यात मजा आहेच खरी. पण
सिनेमा बनवण्याची भूक, तो तयार होत असतानाची धमाल, पुरस्कारापेक्षा फार मोठी आहे.
सॅम्युएल बेकेट ह्यांचं ‘वेटिंग फॉर गोदो’ हे अनेकांना भुरळ घालत आलेलं. तशी ती अभिजितलाही पडली, पण वेगळ्या पद्धतीने. आपल्या वारीची पार्श्वभूमी घेऊन त्याने ‘गोदो’चा विस्तार केला - दोन अंकी ‘भेटी लागी जीवा’. लेखक म्हणून त्याला ह्या नाटकानं अधिक मान्यता दिली.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव झालेल्या ‘कालसर्प’ची कहाणी आणखी वेगळी. त्याची कथा विक्रम गोखले ह्यांना ऐकवली आणि ते म्हणाले, ‘प्रमुख भूमिका मी करणार.’ त्या पहिल्या भेटीचे, नंतर चित्रीकरणाच्या वेळचे त्यांचे अनुभव अभिजित सांगत होता. त्या अभिनेत्याच्या कामाचे, स्वभावाचे मोठेपण सांगत होता.
अभिजितकडे ह्याचे स्वच्छ, सरळ उत्तर आहे - ‘सामान्य माणसाच्या हृदयावर प्रभाव टाकते, त्याला हलवून सोडते ती गोष्ट जिंकते. खरं म्हणजे माणसाच्या मनाला स्पर्श झाला की, तो सिनेमा चांगला होतो. त्यासाठी कथेचा आत्मा कळला पाहिजे.’
गप्पांमध्ये एक जाणवलं की, अभिजित त्या त्या टप्प्यावर भेटलेल्या, मार्गदर्शन केलेल्या सगळ्यांचे ऋण मानतो. विजया मेहता यांच्या एका कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी त्याला मिळाली. त्यांनी दिग्दर्शन आणि संहिता ह्याबाबत सांगितलेले दोन नियम त्याच्या आजही लक्षात आहेत.
पण तरीही पूर्णाँशाने समाधान झालं नाही.
खूप काही बोलायचं, लिहायचं राहिलं आहे.
ह्याचं कारण त्याच्याकडे सांगण्यासारखं खूप काही आहे.
पुढच्या गप्पांचा मुहूर्त बहुतेक तिसऱ्या रजत कमळाचा असेल!
खूप काही बोलायचं, लिहायचं राहिलं आहे.
ह्याचं कारण त्याच्याकडे सांगण्यासारखं खूप काही आहे.
पुढच्या गप्पांचा मुहूर्त बहुतेक तिसऱ्या रजत कमळाचा असेल!
.........




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा