मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

विश्व मराठी संमेलन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भुवीचे पुनरागमन, जर्सी नंबर ७८

भुवनेश्वरकुमार - सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य ः आयसीसी) ----------------------- भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी. नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली...

काही अधिक-उणे, बाकी सगळं ओक्के!

विश्व मराठी संमेलन – पर्व दुसरे, दिवस दुसरा व तिसरा कोणत्याही मराठी साहित्य संमेलनाच्या यशाचं मोजमाप अलीकडे दोन निकषांवर केलं जातं – गर्दी किती जमली  आणि पुस्तकं किती खपली ? हे दोन्ही निकष दुसऱ्या मराठी विश्व संमेलनाला लावणं अवघड आहे. आणि तसंही हे काही निव्वळ साहित्य संमेलन नाही. हे  विश्व   ‘ मराठी ’   संमेलन असल्याचा विसर होऊ न देता निकष लावायला हवेत. पुस्तकांची विक्री न झाल्याची रडकथा एका मराठी दैनिकात मंगळवारी (दि. ३० जानेवारी २०२४) प्रसिद्ध झालीच आहे. पहिला म्हणजे अर्थात गर्दीचा निकष लावायचा झाला, तर समारोपाच्या दिवशी सभागृहात ती फार दिसली नाही. भरगच्च कार्यक्रम असलेलं, रेंगाळलेलं, कार्यक्रमपत्रिका फारशी काटेकोरपणाने अमलात न आलेलं, आळसावलेलं असं हे संमेलन होतं. आणि असं असूनही त्यातले काही कार्यक्रम गाजले. त्यातील बातमीमूल्यामुळे माध्यमांना इच्छा असूनही दुर्लक्ष करता आलं नाही. महत्त्वाचा आणखी एक मुद्दा म्हणजे शेवटचे दोन्ही दिवस संमेलनाच्या व्यासपीठावरून सरकारवर टीका झाली. ती कोणी कितपत गांभीर्याने घेतली, हे यथावकाश कळेल. दोन वक्त्यांचा टीकेचा सूर ‘ मराठीचा जा...
html