मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Social-Distancing लेबलसह पोस्ट दाखवत आहे

दोन रजत कमळांचा ‘अभिजात’ मानकरी ‘अभिजित’

अभिजित दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा... ----------------------------------- ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना ? की ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे बोलायला मिळणं आनंददायक ? ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय ? तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत. ... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच ! कूल... नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे. खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे ! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश मिळ...

जगापासून लांब पळा...पहिल्या लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर

कोरोनोव्हायरसने पछाडलेले जग. (छायाचित्र सौजन्य : ' द गार्डियन ' ) ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, वि श्वातला सर्वांत बुद्धिमान प्राणी म्हणविला जाणारा माणूस कशाला अधिक घाबरतो ? प्रत्यक्ष मरणाला ? की मरणाच्या कल्पनेला ? त्याचं उत्तर जगातल्या बहुतेक देशांमधून आता मिळू लागलं आहे. ' जग जवळ आलं, ' असं विसावं शतक संपता संपता ऐकू येत होतं. वारंवार सांगितलं जाई तसं. एकविसावं शतक सुरू झालं आणि जग खूप जवळ आलं. इतकं जवळ की, मंगेश पाडगावकर यांनी म्हटल्याप्रमाणे ' जवळपणाचे झाले बंधन '! जवळिकीच्या ह्याच बंधनातून सुटका करून घेण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. त्यासाठी निमित्त ठरलं, कोरोनाव्हायरसच्या साथीचं. ' कोविड- १९ ' ह्या संक्षिप्त रूपात ही नवी जागतिक महामारी ओळखली जाते. तिनं अनेक देशांच्या प्रमुखांची झोप उडवली. झोपेचं सोंग घेतलेल्यांचीही उडवली. जे अजून झोपेत आहेत, त्यांच्यासाठी ही काळझोप ठरू नये, एवढीच त्यांना उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची अपेक्षा आहे. जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी असलेल्या कोरोनाव्हायरसच्या...