अभिजित दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा... ----------------------------------- ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना ? की ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे बोलायला मिळणं आनंददायक ? ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय ? तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत. ... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच ! कूल... नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे. खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे ! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश मिळ...
थोडी आवराआवरी सुरू आहे घरात. पुस्तकं, जुनी वर्तमानपत्रं, मासिकं, साप्ताहिकं, कातरणं... पाहायची आणि निकाली काढायची. एरवीचा निकष ह्या वेळी नाही. बरंच काही निकाली निघत आहे, ह्या स्वच्छता मोहिमेत. ‘मोह मोह के पन्ने...’ एक तर रद्दीत जात आहेत किंवा फाडून कचऱ्याच्या डब्यात. बरेच अंक, वर्तमानपत्रांची पानं, कातरणं जपून ठेवलेली. काही नियतकालिकांचे पहिले अंक. काहींचे शेवटचे अंक. त्याच बरोबर काही डायऱ्या आणि कार्यक्रमांच्या नोंदवह्या. ह्या नोंदवह्या फेकून देण्याचं धाडस ह्या वेळीही झालं नाही. त्यात बरंच काही काही आढळतंय. त्यातून नव्याने लिहिण्यासारखंही बरंच सापडलं. पण ते नंतर... ह्या सगळ्या आवराआवरीत मदत करायला एकाला बोलावलेलं. त्याच्या मुली शाळेत शिकतात. कोऱ्या डायऱ्या, एखाद-दुसरंच पान खरडलेल्या वह्या त्या मुलींसाठी आवर्जून देतोय. पुस्तकं झटकून परत ठेवली जात आहेत. पुन्हा कधी तरी उघडली जातील, ह्या आशेनं. पुस्तकांचा एक भला मोठा गठ्ठा समोर आला. त्यात ‘हॅन्स अँडरसनच्या परीकथा’ - १० पुस्तकं. ‘त्याच्या मुलींना देऊन टाका वाचायला...’ असं बायको म्हणाली. आणि एका तिरप्या (पण भोळ्या नव्हे!) कटाक्षाची मानकरी...