भुवनेश्वरकुमार - सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य ः आयसीसी) ----------------------- भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी. नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली...
दिवाळी पाडव्याच्या दिवशी तालुका किंवा छोट्या जिल्ह्याच्या पातळीवरच्या कोणत्याही एस. टी. आगारातून सकाळची पहिली बस कशी बाहेर पडायची? विशेषतः ती पुणे-मुंबई-नागपूर ह्यासारख्या मोठ्या शहरांकडे जाणारी दिवसातली पहिली बस असेल तर? फार आठवण्याची गरज नाही. पंधरा-वीस वर्षांपूर्वीची तर गोष्ट आहे. बस चकाचक असे. हौशी वाहक-चालकांनी टपोऱ्या झेंडूच्या फुलांचा हार पुढे काचेला लावलेला दिसायचा. क्वचित कधी चालकाच्या केबिनमध्ये उदबत्तीचा उग्र सुवास दरवळे. अभ्यंगस्नान करून आलेले चालक व वाहक उत्साही असत. ते हसऱ्या चेहऱ्यानं प्रवाशांचं स्वागत करीत. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेली बलिप्रतिपदा, अर्थात दिवाळी पाडवा आज (शुक्रवार, ५ नोव्हेंबर) आहे. 'एस. टी.' ह्या तीन अक्षराने प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा राज्यभर व्याप आहे. महामंडळाच्या २५८ आगारांपैकी किती आगारांतून आज भल्या सकाळी अशी सजविलेली बसगाडी बाहेर पडेल? किती चालक-वाहक तणावमुक्त दिसतील? - वरच्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर 'नाही' असंच असेल. आपण सारे दिवाळी उत्साहानं आणि आनंदानं साजरी करीत आहोत. त्याच वेळी आपल्या समा...