भुवनेश्वरकुमार - सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य ः आयसीसी) ----------------------- भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी. नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली...
‘ शंकर वावीकर नावाच्या एका सद्गृहस्थांची १८८६ या साली प्रसिद्ध केलेली ‘ वाचन ’ नावाची पुस्तिका माझ्या संग्रही आहे. तिच्या प्रस्तावनेत असं म्हटलेलं आहे की, ‘ हल्लीचे प्रोफेसर आणि शिक्षक हे टेक्स्टबुकांव्यतिरिक्त काही वाचत नाहीत. ’ म्हणजे शंभराहून अधिक वर्षं आपण तीच तक्रार (...वाचक कमी झाले आहेत) करत आलो आहोत. ’ - ‘ अक्षरनिष्ठांची मांदियाळी ’ , पान क्रमांक 136, अरुण टिकेकर (पहिली आवृत्ती, ३१ मार्च २००५, डिंपल पब्लिकेशन) . . . औरंगाबादहून (तेव्हाचे, आता छत्रपती संभाजीनगर) नांदेडला दोन रस्त्यांनी जाता येतं. चालकानं परभणीला न जाता औंढा नागनाथमार्गे नांदेड गाठायचं ठरवलं होतं. त्या दिवशी मला औंढ्याचं दर्शन घडवायचं त्याच्या मनात असेल कदाचित. जालना सोडल्यावर बोरीची (तालुका जिंतूर, जिल्हा परभणी) आठवण झाली आणि वाहनचालक सिद्धार्थला विचारलं, ‘‘ आपल्याला बोरीला जायचंय. जाता येईल का ? वेडंवाकडं तर होणार नाही ना, अंतर फार वाढणार नाही ना ?’’ तसं काही होणार नाही, असा दिलासा देत...