मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Bizarre News लेबलसह पोस्ट दाखवत आहे

दोन रजत कमळांचा ‘अभिजात’ मानकरी ‘अभिजित’

अभिजित दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा... ----------------------------------- ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना ? की ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे बोलायला मिळणं आनंददायक ? ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय ? तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत. ... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच ! कूल... नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे. खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे ! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश मिळ...

विचित्र विश्व, अर्थात अतरंगी बातम्या!

लिहायला-वाचायला शिकल्यापासून पेपर वाचायला लागलो की , पेपर वाचायला लागल्यापासून लिहायला-वाचायला शिकलो , हे आठवणं अंमळ कठीणच आहे. कळतंय तेव्हापासून वाचतोय. पण वाचतोय तेव्हापासून कळतं आहेच , असं अजाबात नाही. सदर लेखकाची (म्हणजे सदर ‘ सदर ’ नव्हे , तर हा मजकूर लिहिणारा लेखक , सदर इसम या अर्थाने!) हीच गोची आहे. कळतंय तेव्हापासून वाचतोय. पण वाचतोय तेव्हापासून कळतं आहेच , असं अजाबात नाही. सदर लेखकाची (म्हणजे सदर ‘ सदर ’ नव्हे , तर हा मजकूर लिहिणारा लेखक , सदर इसम या अर्थाने!) हीच गोची आहे. अस्मादिकांना लहानपणापासून पेपर वाचण्याची फार्फार आवड. पण त्यातील अग्रलेख, लेख, स्फुटे, क्रीडा, अर्थव्यवहार आदी विषयांत आम्हाला कधीच रस नव्हता. राजकारणात चुलीत जावो, नाही तर (विनाअनुदानित) गॅसच्या शेगडीवर होरपळो; त्याच्याशी देणे-घेणे नाहीच! अतरंगी बातम्या हीच आपली आवड (रेखाटण सौजन्य - कृत्रिम बुद्धिमत्ता) ------------------------------ हटके बातम्या हीच खरी आपली आवड. उदाहरणार्थ –‘ शेळीने दिला चार करडांना जन्म ’, ‘ नागाच्या डोक्‍यावर बसला उंदीर ’, ‘ पपईत दिसला गणपती ’, ‘ दुधी भोपळ्यात आढळला मारुती ’ इत्यादी ...