मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

भारत-ऑस्ट्रेलिया लेबलसह पोस्ट दाखवत आहे

'वर' बांधलेल्या गाठी आणि हुकलेल्या गाड्या!

‘त्या गाठी’ तिथे कोठे तरी ‘वर’ बांधल्या जातात म्हणे. काही वेळा ती गाठ अतिशय मुलायम असते, तर काही वेळा घट्ट बांधली जाते. त्यावर नंतरचे आयुष्य स्वर्ग ठरते की नरक, हे अवलंबून असते. अर्थात त्याचा गाठीच्या मुलायमपणाशी किंवा घट्टपणाशी संबंध असतोच, असे ठामपणे म्हणता येणार नाही... हे सर्व तत्त्वज्ञान (ओढून-ताणून) इथे आणणे विनाकारण नसून सबल कारणपरत्वे आहे. लग्नाला कितीही वर्षं झाली तरी बाईची माहेरपणाची ओढ काही संपत नाही. माहेरपेक्षा दुप्पट वर्षं सासरी राहिल्यानंतरही एखादी बाई नवऱ्याला ‘आमच्या घरी अशी पद्धत नव्हती बाई...’ असं सांगते, तेव्हा त्यातला वाच्यार्थ नव्हे तर लक्ष्यार्थ लक्षात घ्यायचा असतो. त्या वाच्यार्थातही तुम्ही लक्ष्य असता, ही गोष्ट वेगळी... काही कामानिमित्त अशाच काही महिला आपल्या मूळच्या गावी आल्या होत्या. ते काहींचे माहेर, काहींचे सासर, तर एखादीचे सासर आणि माहेरही! त्यामुळे गप्पांचा सूर ‘नदीच्या पल्याड बाई झाडी लई दाट तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट...’ असा सारा गदगद झालेला. त्यांनी पाहिलेलं, अनुभवलेलं गाव आता स्वाभाविकच तसं राहिलं नव्हतं. पण त्यांच्या आठवणीत तेच जुनं चित्र असणं स्...

पुनःपुन्हा...विराट आणि विजय!

चॅम्पियन्स करंडक २०२५ - ५ हा घ्या विजयाकडे नेणारा षट्कार...कांगारूंविरुद्ध हार्दिक. (छायाचित्र सौजन्य : आय. सी. सी.) ............... ‘एक दिवशीय क्रिकेटमधला तो अफ्लातून खेळाडू आहे!’ ‘त्यानं संघासाठी अशी कामगिरी अनेक वेळा केलेली आहे.’ अनुक्रमे गौतम गंभीर आणि रोहित शर्मा ह्यांची ही विधानं विराट कोहलीचं महत्त्व ठळक करणारी. चॅम्पियन्स करंडकाच्या दुबईत झालेल्या उपान्त्य फेरीत कांगारूंविरुद्ध विजय मिळवून वनवास संपवणाऱ्या भारतीय संघाने एका दगडात बरेच पक्षी मारले, एवढे नक्की. ---------------------- दोन्ही संघांची मिळून विजेतीपदे मोजली तर ती १६ होतात. अशा दिग्गज संघांमधील उपान्त्य सामन्यात पाच झेल सुटत असतील तर काय म्हणावं! अर्थात ह्या लढतीचा निकाल कमी झेल सोडणाऱ्या संघाच्या बाजूनेच लागला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मंगळवारी (४ मार्च २०२५) झालेल्या चॅम्पियन्स करंडकाच्या पहिल्या उपान्त्य सामन्यात भारतानं विजय मिळविला. हे करताना भारतीय संघानं एका दगडात बरेच पक्षी मारलेले दिसतात. आय. सी. सी.च्या कोणत्याही स्पर्धेत असं चित्र दिसलं आहे की, बाद पद्धतीच्या सामन्यात भारतीय संघ कांगारूंपुढे न...
html