‘त्या गाठी’ तिथे कोठे तरी ‘वर’ बांधल्या जातात म्हणे. काही वेळा ती गाठ अतिशय मुलायम असते, तर काही वेळा घट्ट बांधली जाते. त्यावर नंतरचे आयुष्य स्वर्ग ठरते की नरक, हे अवलंबून असते. अर्थात त्याचा गाठीच्या मुलायमपणाशी किंवा घट्टपणाशी संबंध असतोच, असे ठामपणे म्हणता येणार नाही... हे सर्व तत्त्वज्ञान (ओढून-ताणून) इथे आणणे विनाकारण नसून सबल कारणपरत्वे आहे. लग्नाला कितीही वर्षं झाली तरी बाईची माहेरपणाची ओढ काही संपत नाही. माहेरपेक्षा दुप्पट वर्षं सासरी राहिल्यानंतरही एखादी बाई नवऱ्याला ‘आमच्या घरी अशी पद्धत नव्हती बाई...’ असं सांगते, तेव्हा त्यातला वाच्यार्थ नव्हे तर लक्ष्यार्थ लक्षात घ्यायचा असतो. त्या वाच्यार्थातही तुम्ही लक्ष्य असता, ही गोष्ट वेगळी... काही कामानिमित्त अशाच काही महिला आपल्या मूळच्या गावी आल्या होत्या. ते काहींचे माहेर, काहींचे सासर, तर एखादीचे सासर आणि माहेरही! त्यामुळे गप्पांचा सूर ‘नदीच्या पल्याड बाई झाडी लई दाट तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट...’ असा सारा गदगद झालेला. त्यांनी पाहिलेलं, अनुभवलेलं गाव आता स्वाभाविकच तसं राहिलं नव्हतं. पण त्यांच्या आठवणीत तेच जुनं चित्र असणं स्...
चॅम्पियन्स करंडक २०२५ - २ शतकवीर शुभमन गिल व कर्णधार रोहित शर्मा ह्यांनी जोरदार सलामी दिल्यानंतरही भारताला विजयासाठी थोडं झगडावं लागलंच. (छायाचित्र सौजन्य : आयसीसी) ............... सहा गडी नि एकवीस चेंडू राखून भारताचा विजय, हा दिसणारा निकाल तेवढा काही एकतर्फी नाही. पहिल्या पॉवर प्लेमध्ये निम्मा संघ गारद करूनही बांग्लादेशाला सव्वादोनशेची मजल मारू दिली. षट्कामागं सहा धावांच्या गतीनं खेळूनही नंतर भारतीय फलंदाजांनी फिरकीपुढं तलवार म्यान केली. ----------------------------- - पहिला पॉवर प्ले संपायच्या आधी निम्मा डाव गुंडाळला असताना प्रतिस्पर्ध्याला किती मजल मारू द्यायची? तो डाव किती षट्के चालू द्यायचा? पहिला पॉवर प्ले संपता संपता षट्कामागे सहा धावांहून किंचित अधिक गती राखल्यावर डावाला खीळ कशी लावून घ्यायची? आपल्या कोट्यवधी चाहत्यांच्या मनातली धाकधूक किती वाढवायची? ...वरच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं रोहित शर्मा आणि त्याच्या भिडूंना चांगल्या रीतीनं देता येतील. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतला पहिला सामना जिंकल्यामुळं आज त्यांना ती द्यावी लागत नाहीत, हे खरंय. पण ‘नेट रन रेट’ मोठा ठ...