‘त्या गाठी’ तिथे कोठे तरी ‘वर’ बांधल्या जातात म्हणे. काही वेळा ती गाठ अतिशय मुलायम असते, तर काही वेळा घट्ट बांधली जाते. त्यावर नंतरचे आयुष्य स्वर्ग ठरते की नरक, हे अवलंबून असते. अर्थात त्याचा गाठीच्या मुलायमपणाशी किंवा घट्टपणाशी संबंध असतोच, असे ठामपणे म्हणता येणार नाही... हे सर्व तत्त्वज्ञान (ओढून-ताणून) इथे आणणे विनाकारण नसून सबल कारणपरत्वे आहे. लग्नाला कितीही वर्षं झाली तरी बाईची माहेरपणाची ओढ काही संपत नाही. माहेरपेक्षा दुप्पट वर्षं सासरी राहिल्यानंतरही एखादी बाई नवऱ्याला ‘आमच्या घरी अशी पद्धत नव्हती बाई...’ असं सांगते, तेव्हा त्यातला वाच्यार्थ नव्हे तर लक्ष्यार्थ लक्षात घ्यायचा असतो. त्या वाच्यार्थातही तुम्ही लक्ष्य असता, ही गोष्ट वेगळी... काही कामानिमित्त अशाच काही महिला आपल्या मूळच्या गावी आल्या होत्या. ते काहींचे माहेर, काहींचे सासर, तर एखादीचे सासर आणि माहेरही! त्यामुळे गप्पांचा सूर ‘नदीच्या पल्याड बाई झाडी लई दाट तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट...’ असा सारा गदगद झालेला. त्यांनी पाहिलेलं, अनुभवलेलं गाव आता स्वाभाविकच तसं राहिलं नव्हतं. पण त्यांच्या आठवणीत तेच जुनं चित्र असणं स्...
देखणा फटका... ही बॅट आता निवृत्त झाली! (छायाचित्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सौजन्याने.) .......................................... ही गोष्ट १४ वर्षांपूर्वीची. आय. पी. एल. गाजवलेल्या अजिंक्य रहाणे ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली होती. घरगुती कार्यक्रमानिमित्त तो आपल्या मूळ गावी, म्हणजे चंदनापुरीला येणार होता. त्याला भेटायचं, जमलंच तर बोलायचं आणि बातमी करायची, म्हणून तिथे गेलो होतो. त्या दिवसभराची त्या वेळी केलेली ही बातमी... त्याच्या निवृत्तीनंतर ही भेट आठवली. ............. अजिंक्य रहाणे च्या शब्दांत... क्रिकेट : क्रिकेटची आवड कशी लागली , कधी लागली असं काही नेमकं नाही सांगता येणार ; पण लहानपणापासून खेळायला आवडतं हे नक्की. डोंबिवलीत जेथे राहत होतो , त्या इमारतीत खेळायला सुरवात केली. पुढे खेळतच गेलो. खातू सर माझे पहिले मार्गदर्शक. त्यांच्याच हाताखाली क्रिकेटचे पहिले धडे गिरवले. अर्थात , त्या वेळी सचिन तेंडुलकरचा आदर्श आणि त्याच्यासारखं बनण्याची प्रेरणा होतीच. कसोटी , मर्यादित षटकांच्या लढती आणि टी- 20 यातला कोणता प्रकार अधिक आवडतो ? छे! हा प्रश्नच नाही. मला हा खे...