‘त्या गाठी’ तिथे कोठे तरी ‘वर’ बांधल्या जातात म्हणे. काही वेळा ती गाठ अतिशय मुलायम असते, तर काही वेळा घट्ट बांधली जाते. त्यावर नंतरचे आयुष्य स्वर्ग ठरते की नरक, हे अवलंबून असते. अर्थात त्याचा गाठीच्या मुलायमपणाशी किंवा घट्टपणाशी संबंध असतोच, असे ठामपणे म्हणता येणार नाही... हे सर्व तत्त्वज्ञान (ओढून-ताणून) इथे आणणे विनाकारण नसून सबल कारणपरत्वे आहे. लग्नाला कितीही वर्षं झाली तरी बाईची माहेरपणाची ओढ काही संपत नाही. माहेरपेक्षा दुप्पट वर्षं सासरी राहिल्यानंतरही एखादी बाई नवऱ्याला ‘आमच्या घरी अशी पद्धत नव्हती बाई...’ असं सांगते, तेव्हा त्यातला वाच्यार्थ नव्हे तर लक्ष्यार्थ लक्षात घ्यायचा असतो. त्या वाच्यार्थातही तुम्ही लक्ष्य असता, ही गोष्ट वेगळी... काही कामानिमित्त अशाच काही महिला आपल्या मूळच्या गावी आल्या होत्या. ते काहींचे माहेर, काहींचे सासर, तर एखादीचे सासर आणि माहेरही! त्यामुळे गप्पांचा सूर ‘नदीच्या पल्याड बाई झाडी लई दाट तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट...’ असा सारा गदगद झालेला. त्यांनी पाहिलेलं, अनुभवलेलं गाव आता स्वाभाविकच तसं राहिलं नव्हतं. पण त्यांच्या आठवणीत तेच जुनं चित्र असणं स्...
ऑलिंपिक, भारत आणि हॉकी - २ आधुनिक ऑलिंपिकचा अध्याय (ज्याचा उल्लेख जागतिक पटलावर नेहमीच Modern Olympics असा होतो) सुरू झाला, त्याचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष. अथेन्समध्ये (ग्रीस) ६ ते १५ एप्रिल १८९६ असे दहा दिवस झालेल्या पहिल्या ऑलिंपिक खेळाची व्याप्ती किती मोठी होती? आता मजा वाटते वाचताना, जागतिक पातळीवर क्रीडा क्षेत्रात एका नव्या अध्यायाची सुरुवात करणाऱ्या ह्या स्पर्धेत डझनभर देशांतून २०८ खेळाडू सहभागी झाले होते. ह्याच आकड्यांनी सव्वाशे वर्षांत किती मोठा टप्पा गाठला आहे. टोकियो निप्पॉन महोत्सवात (२०२२) २०६ देशांच्या १२ हजार खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे. अर्थात कोविड-१९ महामारीमुळे ही संख्या घटेलही कदाचित. पहिल्या ऑलिंपिकमध्ये एकूण ४३ क्रीडाप्रकार होते. त्यात हॉकीसह अन्य कोणताच सांघिक खेळ नव्हता. ह्या जागतिक क्रीडा महोत्सवात येण्यास हॉकीला साधारण एक तप वाट पाहावी लागली. नंतरच्या वाटचालीतही काही अडथळे आलेच. लंडन (इंग्लंड), १९०८ ऑलिंपिकच्या चौथ्या स्पर्धेमध्ये पुरुषांच्या फिल्ड हॉकीचा (आता इथून पुढे आपण त्याला फक्त ‘हॉकी’च म्हणू.) पहिल्यांदा समावेश झाला. लंडन (इंग्लंड) येथे २७ एप्र...