मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

व्यर्थ चिंतन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पहिला फोटो, 'केसरी' आणि ५१ रुपयांचे बक्षीस

स्वतःचा पहिला फोटो छापून येणं आणि शिवाय त्यासोबत बक्षीसही. किती मोठी गोष्ट होती ती त्या काळातली आणि आजचीही! दैनिक केसरीमध्ये लिहिलेलं वाचकाचं पत्र आणि त्याची त्या महिन्यातली सर्वोत्तम पत्र म्हणून झालेली निवड. बरोब्बर ४० वर्षांपूर्वी - ९ सप्टेंबर १९८६! ----------- ‘ लवकर उठायचंच आज ’ असा निश्चय करून ( नेहमीप्रमाणेच) उशिरा उठलो. सगळं आवरून दुपारच्या सुमारास कार्यालयात गेलो. ‘ शतायुषी ’ दिवाळी अंकात संपादकीय सहायक म्हणून काम करायला सुरुवात झाली होती. ‘ पत्रकार ’ ह्या नात्यानं पहिली नोकरी. हल्लीच्या भाषेत सांगायचं तर ‘ कॅम्पस इंटरव्ह्यू ’ मधून निवड झालेली होती माझी. परीक्षेचा निकाल लागण्याच्या आधीच. संज्ञापन व वृत्तविद्या विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्र. ना. परांजपे ह्यांचे घरच्या पत्त्यावर कार्ड आले होते - ‘ एका दिवाळी अंकाच्या संपादकांना सहायकाची गरज आहे. तुम्हाला रस असेल तर कार्यालयीन वेळेत भेटायला यावे. ’ (ते पोस्टकार्ड अजून संग्रहात आहे.😅) कसा कोणास ठाऊक, पण प्र. ना. ह्यांचा मी बऱ्यापैकी लाडका विद्यार्थी होतो. त्यामुळेच त्यांना ह्या जागेसाठी माझी आठवण झाली. त्या दिवशी त्यांनी...

ए. आय. आणि आय. आय. : पेन ते वांगे

  फेसबुकवर बऱ्यापैकी नियमित छोटं-मोठं लिहितोय सध्या. आता अगदी दोन दिवसांपूर्वी हस्ताक्षरदिनाचं निमित्त साधून लिहिलं. त्यात पेनाचा (म्हणजे तो नसल्याचा) उल्लेख केला. ह्या पोस्टनंतर एका दिवसांतच मला पेनांच्या जाहिराती दिसू लागल्या. त्याच्या किमतीही हजारांपासून लाखापर्यंत. 'लाखाची ऐपत असती, तर फुकाची पोस्ट कशाला टाकली असती?', असं त्यावर लिहिलं. त्यावर (फेसबुक) मित्रांनी हसून घेतलं. (गरिबावर काय कुणी हसतं... आणि त्यातही पेन नसल्यानं लिहू न शकणाऱ्यावर तर खदाखदा!) त्याच्या आधी मंडईबद्दल लिहिलं होतं. त्याचा विषय खरं तर वेगळाच होतो. नेहमीप्रमाणेच भरकटायला झालं. नमनाला धडाभर तेल नेहमीच जातं आपलं. (त्याचं ताजं उदाहरण म्हणजे हेच की!) चिकू घ्यायला लावणाऱ्या आणि तलाठी असूनही पैसे न खाणाऱ्या मुलाचा अभिमान बाळगणाऱ्या मावशी. त्यानंतर 'तलाठी परीक्षेत हमखास यश', 'घोलवडचे चिकू' किंवा 'घरपोहोच भाजी' अशी काही जाहिरात दिसली नाही. का बुवा दिसली नसावी? फेसबुकच्या 'अल्गोरिदम'मध्ये ते नसणार बहुतेक. मंडईचा विषय निघाला आणि वांग्याला टाळून गेलो, असं कधी होणारच नाही. 'भाज...

शहाणपणाची कवाडे उघडा

  अजून किती दिवस पाहायला मिळणार नाही हे दृश्य ? ( छायाचित्र सौजन्य : स्क्रोल / एचटी) ....................... ' T he only thing you absolutely have to know is the location of the library. ' अल्बर्ट आईनस्टाईन ह्यांचं हे प्रसिद्ध वाक्य आहे. ' सर्च एंजिन ' वर ' बुक कोट्स ' टाकलं की, पाच-पन्नास संकेतस्थळं सेकंदामध्ये त्यांचं हे उद्धृत ठळकपणे दाखवून देतात. माझ्या घरापासून वाचनालय जवळ आहे. तिथपर्यंत चालत जायला १०-१२ मिनिटं पुरेशी होतात. पण कित्येक दिवसांत ; नेमकं सांगायचं, तर २२ मार्चपासून तिथं जाताच आलं नाही. सहा महिने होऊन गेले त्याला. त्याच्या आधी १५ दिवस आणलेली अनुवादित कादंबरी पडून आहे. तिची पारायणंही शक्य होती. ' नगर वाचनालय ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्हा वाचनालयाचं स्थळ माझ्यासह सगळ्याच सभासदांना अगदी चांगलं माहीत आहे. पण आमच्यासारख्या सामान्यांच्या जगण्यात त्याचं नेमकं ' स्थान ' काय आहे (किंवा काय असावं!), हे प्रशासनाला किंवा राज्यकर्त्यांना उमगलेलं नाही. त्यामुळंच लाखभर पुस्तकं असलेल्या ह्या सार्वजनिक वाचनालयाचं दार अजून बंदच आ...

बातमीच्या पलीकडे...बळीचा बकरा?

सा धारण तीन महिन्यांपूर्वी एबीपी माझा वृत्तवाहिनीने ' डिजिटल महाराष्ट्र ' असा दिवसभराचा परिसंवाद आयोजित केला होता. त्यातील एक सत्र '' ट्रोल ' धाडी ' बद्दलचे होते. सामाजिक माध्यमांवर कसं, किती नि कोणत्या पातळीवर जाऊन ' ट्रोल ' केलं जातं, ह्याचे किस्से व भीषण अनुभव एक अभिनेता, एक सामाजिक कार्यकर्ता ह्यांनी त्यात सांगितले. पुढच्या वर्षी ह्याच विषयावर सत्र आयोजित करून त्यात ' एबीपी माझा ' चे संपादक राजीव खांडेकर आणि प्रतिनिधी राहुल कुलकर्णी ह्यांना बोलायला सांगितलं पाहिजे. कारण दोघांनी गेले दोन दिवस ह्याचा पुरेपूर अनुभव घेतला आहे. निमित्त वांद्र्यात झालेल्या गर्दीचं. वांद्र्यात मंगळवारी (दि. १४ एप्रिल) झालेली गर्दी, त्यावरून उठलेली राळ, पत्रकारासह दोघांना झालेली अटक हा सगळा घटनाक्रम दोन दृष्टिकोणांतून पाहायला हवा. राजकारण आणि पत्रकारिता . (त्यातील उपविभाग म्हणजे पत्रकारितेतील राजकारण !) एका बातमीची ' मोठी चूक ' संपादक व प्रतिनिधी यांना भोवली, असं सकृतदर्शनी तर दिसत आहे. मुंबईतल्या वांद्रे पश्चिम उपनगरी रेल्वेस्थानकाबाहे...

अण्णा ते अनामिका...

देशप्रिय अनामिकेस , नमस्कार , चमत्कार वगैरे... फार फार दिवसांनंतर , वर्ष की दीड वर्षांनंतर दिल्लीत पुन्हा जंतरमंतर निदर्शनांचे तेच तंतर-मंतर गाजते तर आहेच नवी दिल्ली पण तुझीच चर्चा गल्लोगल्ली धिक्काराचा घेऊन बावटा आणि वळवित मनगटा सूर निषेधाचा घुमतोय केवढा असंतोष धुमसतोय! विजयपथ ते रायसीना चालून गेली तरुणसेना प्रश्न एकच एक विचारतेय इथे सत्ता कोणाची चालतेय ? ही मोगलाई की लोकशाही ? की कायद्याचे राज्यच नाही ? कँडलमार्च आणि मशालमोर्चा अवघड बाईपणाची सारी चर्चा वाढता टीआरपी , भडक मथळे पुन:पुन्हा आमचे रक्त उसळे बये , तुझ्याचमुळे हे घडले , सारे थोडे भानावरती आले कुणाला आठवते , मलाही तीन मुली कारवाई करण्याची पक्की आहे बोली जमल्यास फाशी , जन्मठेप नक्की न्यायाची मिळते इथे खात्री पक्की बये , बरी हो , पुढे चालू लाग गिळून टाक ती मनातली आग जमलेच तर विसर ती आठवण माहितीये , मनावर राहतीलच वण! . . . मागे असेच होते झाले अण्णा बोले आणि देश हाले हद्दपार करणार होतो भ्रष्टाचार गांधी टोपी घालून केला एल्गार विझल्या ज्योती , विझले निखारे म्हणती माझ्या मागल्या ये ...