मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पहिला फोटो, 'केसरी' आणि ५१ रुपयांचे बक्षीस

स्वतःचा पहिला फोटो छापून येणं आणि शिवाय त्यासोबत बक्षीसही. किती मोठी गोष्ट होती ती त्या काळातली आणि आजचीही! दैनिक केसरीमध्ये लिहिलेलं वाचकाचं पत्र आणि त्याची त्या महिन्यातली सर्वोत्तम पत्र म्हणून झालेली निवड. बरोब्बर ४० वर्षांपूर्वी - ९ सप्टेंबर १९८६! ----------- ‘ लवकर उठायचंच आज ’ असा निश्चय करून ( नेहमीप्रमाणेच) उशिरा उठलो. सगळं आवरून दुपारच्या सुमारास कार्यालयात गेलो. ‘ शतायुषी ’ दिवाळी अंकात संपादकीय सहायक म्हणून काम करायला सुरुवात झाली होती. ‘ पत्रकार ’ ह्या नात्यानं पहिली नोकरी. हल्लीच्या भाषेत सांगायचं तर ‘ कॅम्पस इंटरव्ह्यू ’ मधून निवड झालेली होती माझी. परीक्षेचा निकाल लागण्याच्या आधीच. संज्ञापन व वृत्तविद्या विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्र. ना. परांजपे ह्यांचे घरच्या पत्त्यावर कार्ड आले होते - ‘ एका दिवाळी अंकाच्या संपादकांना सहायकाची गरज आहे. तुम्हाला रस असेल तर कार्यालयीन वेळेत भेटायला यावे. ’ (ते पोस्टकार्ड अजून संग्रहात आहे.😅) कसा कोणास ठाऊक, पण प्र. ना. ह्यांचा मी बऱ्यापैकी लाडका विद्यार्थी होतो. त्यामुळेच त्यांना ह्या जागेसाठी माझी आठवण झाली. त्या दिवशी त्यांनी...

पासवर्डपायी परवड!

गोष्ट आठ-दहा महिन्यांपूर्वीची आहे. कदाचित वर्षभरापूर्वीची. अजूनही ती आठवण झाली की , अस्वस्थ व्हायला होतं. अस्मादिकांचा ‘ कासिम ’ झाला होता तेव्हा ! जीव तडफडत होता नुसता. घुसमट सुरू होती. एवढ्या कष्टानं जमवलेला खजिना डोळ्यांदेखत गुडूप होणार असं दिसत होत. गुप्तधन होणार त्याचं ! या खजिन्याची कधीही आठवण झाली की , तडफड वाढायचीच. त्याचा लोभ काही सुटणारा नव्हता. त्यासाठी किती कष्ट केले , किती वेळ घालवला , हे माझं मलाच माहीत. खजिन्यापायी कासिमचा तर जीवच गेला होता. माझी फक्त अस्वस्थता वाढणार होती , वाढत होती. हा कासिम कोण ? फा ss र पुरातन इसम आहे तो. आखातातला. ‘ अलिबाबा आणि चाळीस चोर ’ गोष्टीतला कासिम. ‘ अरेबियन नाइट्स ’ मधल्या एक हजार एक रात्रींतली किंवा ‘ अलिफ़ लैला ’ मधली प्रसिद्ध गोष्ट. तिचा नायक अलिबाबा. कासिम त्याचा भाऊ. अलिबाबाला धमकावून डाकूंच्या खजिन्यावर हात मारायला गेला आणि परतीच्या वेळी घोळ झाला. तिथल्या रत्ना-माणकांनी डोळे दिपले आणि गुप्त खजिन्याचं बंद झालेलं दार उघडायचा पत्ता विसरला. परवलीचा शब्द. ‘ गव्हा उघड ’, ‘ जवसा उघड ’, ‘ सातू उघड ’ ... असं बरंच काही. पण ‘ ...