मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

पद्यासारखं गद्य लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पहिला फोटो, 'केसरी' आणि ५१ रुपयांचे बक्षीस

स्वतःचा पहिला फोटो छापून येणं आणि शिवाय त्यासोबत बक्षीसही. किती मोठी गोष्ट होती ती त्या काळातली आणि आजचीही! दैनिक केसरीमध्ये लिहिलेलं वाचकाचं पत्र आणि त्याची त्या महिन्यातली सर्वोत्तम पत्र म्हणून झालेली निवड. बरोब्बर ४० वर्षांपूर्वी - ९ सप्टेंबर १९८६! ----------- ‘ लवकर उठायचंच आज ’ असा निश्चय करून ( नेहमीप्रमाणेच) उशिरा उठलो. सगळं आवरून दुपारच्या सुमारास कार्यालयात गेलो. ‘ शतायुषी ’ दिवाळी अंकात संपादकीय सहायक म्हणून काम करायला सुरुवात झाली होती. ‘ पत्रकार ’ ह्या नात्यानं पहिली नोकरी. हल्लीच्या भाषेत सांगायचं तर ‘ कॅम्पस इंटरव्ह्यू ’ मधून निवड झालेली होती माझी. परीक्षेचा निकाल लागण्याच्या आधीच. संज्ञापन व वृत्तविद्या विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्र. ना. परांजपे ह्यांचे घरच्या पत्त्यावर कार्ड आले होते - ‘ एका दिवाळी अंकाच्या संपादकांना सहायकाची गरज आहे. तुम्हाला रस असेल तर कार्यालयीन वेळेत भेटायला यावे. ’ (ते पोस्टकार्ड अजून संग्रहात आहे.😅) कसा कोणास ठाऊक, पण प्र. ना. ह्यांचा मी बऱ्यापैकी लाडका विद्यार्थी होतो. त्यामुळेच त्यांना ह्या जागेसाठी माझी आठवण झाली. त्या दिवशी त्यांनी...

अरविंदा? ...गोविंदा!

  (दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ह्यांना अटक झाल्याची बातमी वाचली आणि बरोबर दहा वर्षं आणि एक महिन्यापूर्वी लिहिलेली ही रचना आठवली. प्रस्थापित लोकशाहीतील बड्या खेळाडूंविरुद्ध ते लढतील, त्यांना नडतील आणि  अंतिमतः जिंकतील, असा (भाबडा) विश्वास वाटत होता. त्याच अपेक्षेतूनच हे लिहिलं होतं. नंतर जे काही घडत गेलं, त्यातून राजकारण आपल्याला कळत नाही, हा समज दृढ झाला.) आलाय खेळात घेऊ या घोळात देऊ या दणका दिल्लीच्या बोळात पाठिंब्याचा झोका दिला एक मोका सापडल्या क्षणी मारू मस्त ठोका आपलाच खेळ आपलाच मेळ घुसला हा कसा घातलान् घोळ खुर्चीवर बसतो रस्त्यावर येतो लाल दिवा फुंकून धरणे कसा धरतो विनाशर्त खास समर्थनाचा गॅस परि सोडेचिना लोकपालाचा ध्यास आधी धरली गल्ली आता लक्ष्य दिल्ली हमसे ही म्यांव अरे! अपनीच बिल्ली वाटले होते कोंडू खोड याची मोडू कचऱ्यातच काढतोय हाती घेऊन झाडू त्यांची मेणबत्ती ह्यांची उदबत्ती म्हणाला, खाली लगाव बत्ती! अण्णांचा चेला सवाई निघाला रामलीला करून लईच पुढे गेला कुणी जुने तपस्वी काही नवे तेजस्वी विरोधाला पुरून उरे केवढा हा मनस्वी वाटले होते गोड लागेल त्याला खुर्ची भलतीच ...

एक फोटो आणि एक कविता (२))

  साधारण दोन वर्षांपूर्वी एक छायाचित्र मोबाईलमध्ये टिपलं आणि ते पाहताना काही ओळी सुचल्या. कवितेसारख्या... तसंच आज झालं. आता रात्री ते पाहताना पुन्हा काही लिहावं वाटलं. मग ‘एक फोटो आणि एक कविता’ मालिकेत भर टाकावी म्हटलं. हा तो अध्याय क्रमांक दोन... कळणे आणि वळणे ----------------------- कुठून कसे पडले बीज आणि कसे अंकुरले कळले नाही तहान भागविण्यासाठी कुठून कसे पाणी घेतले कळले नाही बंद वाड्याच्या दाराशी, रस्त्याच्या कडेला कसे तगून राहते कळले नाही येणाऱ्या-जाणाऱ्यांचा लत्ताप्रहार कसा काय सोसत राहते कळले नाही वाहनांचा काळाकुट्ट धूर फुफ्फुसात कसे भरून घेते कळले नाही पान-तंबाखू-गुटक्याच्या पिचकाऱ्या नित्य साहते कसे तेही कळले नाही किती दिवस आहे अजुनी आयुष्य त्याचे हिरवेगार कळले नाही . . . . मिळेल तेवढे हसत जगावे, संधी साधून फुलत राहावे, पालवीला मिरवत हसावे बरीक त्याला वळले, एवढे मात्र कळले! ------------- (दि. १ ऑक्टोबर २०२३) ........... #पद्यासारखं_गद्य #कविता #फोटो #एक_फोटो_आणि_एक_कविता

नंतर आणि आधी... पुरती बरबादी

  (छायाचित्र सौजन्य - www.livehindustan.com ) थोडी पार्श्वभूमी... गोष्ट दहा वर्षांपूर्वीची आहे. न्यायालयीन निकालाची आहे. कायदेमंडळाची आहे. लोकप्रतिनिधींची आहे. त्यांना न्यायालयाच्या निर्णयापासून संरक्षण देणाऱ्या अध्यादेशाची आहे. ...आणि गोष्ट राहुल गांधी ह्यांची आहे. लोकसभेचं सदस्यत्व रद्द झालेल्या काँग्रेसच्या माजी अध्यक्षांची. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता - खासदार वा आमदाराला दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ शिक्षा झाली, तर त्याचे (संसदेचे/विधीमंडळाचे) सदस्यत्व तत्काळ प्रभावाने रद्द होईल आणि पुढची निवडणूकही लढवता येणार नाही. त्या वेळी केंद्रात सरकार होते संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार आणि पंतप्रधान होते डॉ. मनमोहन सिंग. सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या निर्णयापासून लोकप्रतिनिधींना संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकार सरसावले. तसा अध्यादेश सरकारने काढला. आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाच्या लालूप्रसाद यादव ह्यांच्यासाठी हे पाऊल उचलल्याची चर्चा होती. आजचा सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व डावे पक्ष ह्यांनी तेव्हा अध्यादेशाला विरोध केला होता. वाढता विरोध पा...

...हा माझाच देश आहे!

  चिडतो, कुढतो, रडतो नशिबाला बोल लावतो कधी कधी शिव्या देतो ...तरी हा माझा देश आहे! दोषांची परवचा म्हणतो उणे-दुणेच काढत बसतो तेच ते उगाळत राहतो ...तरी हा माझा देश आहे! नळ कोरडाठक्क दिसतो रस्त्यांवरचे खड्डे मोजतो कुरकुर करीत कर भरतो ...तरी हा माझा देश आहे! नियम सारे ठोकरतो कायदे बहुदा मोडतो मुर्दाडपणे पुढे जातो ...तरी हा माझा देश आहे! व्यवस्थेच्या नावे बोटे मोडतो नाहीच सुधारणार, शाप देतो गरजतो अन् मनातच बरसतो ...तरी हा माझा देश आहे! कामासाठी लाच देतो हळूच वशिला लावतो कधी फक्त तमाशा बघतो ...तरी हा माझा देश आहे! परदेशाचे कौतुक गातो संधी मिळता तिकडे जातो तिथून इथे बोट दाखवतो ...तरी हा माझा देश आहे! कधी शेतकऱ्यांसाठी हळहळतो कधी कष्टकऱ्यांसाठी खंतावतो कधी उपऱ्यांवर पार वैतागतो ...तरी हा माझा देश आहे! लॉकडाऊन पुरता पाळतो मनाविरुद्ध घरातच बसतो लढून हरवू म्हणत राहतो ...तरी हा माझा देश आहे! सांगितल्यावर टाळ्या पिटतो अनामिकासाठी दिवा लावतो मदतीसाठी पुढेही सरसावतो ...तरी हा माझा देश आहे! हॉकीचे सामने मजेत बघतो सिंधूला सारखं चिअरिंग करतो  मग एक भाला काळजात घुसतो ...हा माझा, माझाच देश आहे! ऑ...

देणाऱ्याने नि खाणाऱ्याने...

तसं पाहिलं तर खाण्याशी आपल्या सगळ्यांचा नित्य संबंध असतो. असं असतानाही 'खाण्या'बाबत पोलिस खात्याकडंच सगळे बोट दाखवतात. ह्या आठवड्यात तसंच झालं. पुण्यातली बिर्याणी गाजली. मसालेदार नसलेलं, फार तेलकट नसलेलं असं सात्त्विक नि साजूक तुपातलं खाणं अचानक चर्चेत आलं. त्यावरून आठवली एक जुनी रचना. आठ वर्षांपूर्वी, तेव्हाच्या मंत्र्याने पोलिसांच्या 'खाण्या'बद्दलच जाहीर विधान केलं होतं. त्या वेळी लिहिलेली ही विरुपिका.... (अर्कचित्र सौजन्य - https://www.pngitem.com) विंदा ते आबा - एक विरुपिका! देणाऱ्याने देत जावे लिहून गेलेत विंदा खाणाऱ्याने खात ऱ्हावे सांगून राह्यलेत आबा पगार म्हणे नाही पुरत 'हप्ता'ही त्यात नाही सरत खिशात काहीच नाही उरत म्हणूनच खाती परत परत जेवण करायला पोटभर लागतात रुपड्या बारा तेवढाही पगार मिळेना गरिबीचे वाजले तीन-तेरा   ज्याच्या हाती आहे पद त्याने थोडी खावी साय टिकवणार नाही हातावर त्याची उद्धरावी आय-माय   मिळेल जेव्हा संधी तेव्हा मटकावून टाकावे लोणी कशाला उगा डोळेझाकणी पाह्यला ते वेडंय का कुणी? तलाठी अडवितोय सात-बारा पाटकरी जिरवून राहिलाय झरा रावसाहेबांना आ...

एक फोटो आणि एक कविता

  आकाश निरभ्र फांद्या निष्पर्ण सभोवताल उदास, जीर्ण उद्या कदाचित भरून येईल आभाळ कोसळत राहतील सरी डहाळीला नवी उभारी औदासीन्य जाईल जीर्णोद्धार होईल आजचे काहीच उद्या ना राहील -------------- दि. २४ जून २०२१

'शार्ली एब्दो'साठी...

फ्रान्सच्या राजधानीतून - पॅरिस येथून प्रकाशित होणारे ' शार्ली एब्दो ' साप्ताहिक व्यंग्यात्मक लेखनासाठी प्रसिद्ध आहे. त्यात प्रामुख्याने बोचरी व्यंग्यचित्रे असतात. अशाच एका व्यंग्यचित्राचे निमित्त करून इस्लामी अतिरेक्यांनी ७ जानेवारी २०१५ रोजी साप्ताहिकाच्या मुख्यालयावर हल्ला केला. त्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात बारा जण मृत्युमुखी पडले. त्यामध्ये संपादक, व्यंग्यचित्रकार ह्यांच्यासह आठ पत्रकारांचा समावेश होता. त्या पार्श्वभूमीवर दुसऱ्याच दिवशी, आठ जानेवारी २०१५ रोजी लिहिलेली ही रचना त्या वेळी एका अनुदिनीवर प्रकाशित झाली. सध्या फ्रान्समध्ये जे काही चालले आहे आणि त्याचे पडसाद ज्या पद्धतीने जगभर उमटत आहेत, ते पाहिल्यावर साडेपाच वर्षांपूर्वीच्या ह्या लिखाणाची आठवण झाली. हल्ल्याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेले पॅरिसचे रहिवासी. (छायाचित्र सौजन्य - सी. एन. एन.) ------------------------ शब्द हे आहे शस्त्र एकदम जपून वापरा कुंचला म्हणजे अस्त्र थोडे सावरून चालवा   पचेल तेच लिहा रुचेल तेच बोला पटेल तेच काढा   ऐकत नाही ? मारा-झोडा! पेन ? टाका मोडून! ब्रश ? द्या फेकून! शाई-रंग ? द्...

चांगभले...तुमच्याचमुळे

वारं ते सुटलंय सुसाट येणारे पुन्हा त शी च लाट ? लागणारे  का पुरती वाट ? झिंगझिंगाट... आता पुरती हो अडचण म्हणूनच तुमची आठवण पदोपद आणि क्षणोक्षण नामसंकीर्तन तुमचे... नवे जेव्हा केव्हा काही घडे बडवू जुने नगारे - चौघडे भूतकाळाचीच ही देण गडे जयजयकार तुमचा... ये देशी तुम्ही आणिले विज्ञान कसले कसले भारी तंत्रज्ञान अन्यथा सारा अंधारी अज्ञान तुम्हां पूर्वी नि सांप्रत... तुम्ही स्थापिली आयआयटी तुमच्यामुळेच उभी अणुभट्टी फळे मिळती रसाळ गोमटी तुमच्याच कारणे... ' इस्रो ' तुमची स्वप्नपूर्ती दिल्लीमधील ' तीन मूर्ती ' देत राहिली सदा स्फूर्ती किती गावो कीर्ती... बांधला होता तुम्हीच चंग मंगलयान ते उडाले बूंग कौतुकात राही देश दंग तुम्हीच करवियले... लढविली होती तेव्हा युक्ती म्हणुनी आज दिसे महाशक्ती एवढ्या निमित्ते करितो भक्ती तुमची आणि तुमचीच... सीमेवरी खडे सज्ज सैन्य कधीचे हटले देशाचे दैन्य गाठीला बांधले गेले पुण्य कृतकृत्य वाटे... तुम्हीच एकमेव जंटलमन या देशीचे लास्ट इंग्लिशमन आता बहु ...

इये राजकारणाचिये नगरी

इतिहासाचे जुने साक्षीदार ऐसे एक आटपाट ' नगर ' पौरजनांचा सदा चाले गजर शहर माझे भले । नगरी ही नावाने शेलाटी नसे   काना , मात्रा , वेलांटी नित्य नवी मारी कोलांटी राजकारण तिथले । पाहण्या नगराचा कारभार पालक संस्था ' महा ' फार निधीच्या अभावी आजार तिला सदा नि कदा । तिथे एकदा जाण्याकरिता म्हणे सेवक होण्याकरिता आटापिटा जिवाचा करिता इच्छुकांची तोबा दाटी । फूल पाकळ्यां चे कोणा हाती कुठे वाघोबाचा होतसे हत्ती येई ल त्याला पावन करिती दत्तकविधान पवित्र । निवडणुकीचा खेळ मजेदार घ्यावे दोन नि द्यावे चार खरे पाहता असे व्यवहार छनछनाट सा रा । कोणा गरिबा दाखवावा गुत्ता कोणासी करून द्यावा रस्ता कोणा एखाद्याची मालमत्ता द्यावी छान रंगवोनी । होता जाहीर तो निकाल लागे अनेकांचा निक्काल फास ला विजयाचा गुलाल अडुसष्टांच्याच माथी । बहुमता साठी संख्या अपुरी न लागे एक नाव किनारी नवागत अश्व उभे बाजारी लिलावासाठी सिद्ध। याचे आणि त्याचे जमेना त्याला शूत्रविना करमेना आकडेमोडीनंतरही जुळेना सत्तेचे समीकरण...