आकाश निरभ्र
फांद्या निष्पर्ण
सभोवताल
उदास, जीर्ण
उद्या कदाचित
भरून येईल आभाळ
कोसळत राहतील सरी
डहाळीला नवी उभारी
औदासीन्य जाईल
जीर्णोद्धार होईल
आजचे काहीच
उद्या ना राहील
--------------
दि. २४ जून २०२१
ही प्रसन्न छबी सावंतवाडीजवळच्या घाटातली. आम्ही असंच एकदा बेळगावला गेलो होतो तेव्हाची.. ------------------------------------ ‘ आपण एकदा मु...
छान फॉर्म वापरलाय!!
उत्तर द्याहटवा💐💐👌👌👍👍
Great sir
उत्तर द्याहटवाक्या बात है सरजी.
उत्तर द्याहटवाअप्रतिम फोटो आणि अप्रतिम कविता.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जरी उदासी, किंचित
उत्तर द्याहटवानभ हे तांबूस
पक्व फळापरी
पडेल पाऊस
निष्पर्ण वृक्षालाही
धुमारतील पाने
नव्या ऋतूची
ही नव वसने
या लवलवत्या
नव कोंबातुनी
सृष्टीचक्र हे
वाहे जीवनी