Thursday 24 June 2021

एक फोटो आणि एक कविता

 
























आकाश निरभ्र

फांद्या निष्पर्ण

सभोवताल

उदास, जीर्ण


उद्या कदाचित

भरून येईल आभाळ

कोसळत राहतील सरी

डहाळीला नवी उभारी


औदासीन्य जाईल

जीर्णोद्धार होईल

आजचे काहीच

उद्या ना राहील

--------------

दि. २४ जून २०२१

4 comments:

  1. छान फॉर्म वापरलाय!!
    💐💐👌👌👍👍

    ReplyDelete
  2. क्या बात है सरजी.
    अप्रतिम फोटो आणि अप्रतिम कविता.
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    ReplyDelete
  3. जरी उदासी, किंचित
    नभ हे तांबूस
    पक्व फळापरी
    पडेल पाऊस

    निष्पर्ण वृक्षालाही
    धुमारतील पाने
    नव्या ऋतूची
    ही नव वसने

    या लवलवत्या
    नव कोंबातुनी
    सृष्टीचक्र हे
    वाहे जीवनी

    ReplyDelete

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...