भुवनेश्वरकुमार - सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य ः आयसीसी) ----------------------- भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी. नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली...
पत्रकारिता, मैत्री आणि साधेपणा प्रतापरावांचं हे छायाचित्र त्यांच्या गावच्या शिवारातील. आम्ही हुरडा खायला गेलो होतो, त्या वेळचं. त्यांच्या खांद्याला अडकवलेली पिशवी माझी आहे. मला फोटो काढायला अडचण होऊ नये म्हणून त्यांनी पूर्ण वेळ बाळगली. दुसऱ्याची जबाबदारी आपलीच असल्याच्या त्यांच्या स्वभावाला जागून... .......... ‘केसरी’त माझी नोकरीसाठी मुलाखत झाली, त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रतापरावांचे लग्न झाले. नंतर आम्ही सहकारी बनलो. लक्षात आलं की, ते आग्रही नाहीत आणि अनाग्रही नाहीत. पडलेले काम पूर्ण करणार. वडीलधारे असूनही वडीलकी गाजवणार नाहीत. पुढे आमचे मैत्र अधिक जुळले. हे व्यक्तिचित्र कोण्या नायकाचे नाही, तर साध्यासुध्या, मैत्री जपणाऱ्या प्रतापरावांचे! -------------- ‘केसरी’च्या नगर आवृत्तीच्या कार्यालयात त्यांना ‘देशपांडे’, ‘प्रताप’ आणि ‘प्रतापराव’ अशा वेगवेगळ्या तऱ्हेनं संबोधलं जाई. वरिष्ठ त्यांच्या मागे क्वचित ‘प्रताप’ असा (एकेरी) उल्लेख करीत. एरवी त्यांना आडनावानं, किंवा मग नावापुढं ‘राव’ लावूनच हाक मारली जाई. थेट भेट होण्याआधीच प्रतापरावांची वेगळ्या तऱ्हेनं ओळख झाली. त्यांचं...