मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

वि वि करमरकर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भुवीचे पुनरागमन, जर्सी नंबर ७८

भुवनेश्वरकुमार - सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य ः आयसीसी) ----------------------- भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी. नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली...

क्रीडा पत्रकारितेतील ‘आजोबा’

(छायाचित्र सौजन्य : खेलो इंडिया) ............ मराठी क्रीडा पत्रकारितेतील एक महत्त्वाचं आणि अग्रगण्य नाव म्हणजे हेमंत जोगदेव. दीर्घकाळापासून मैदानावर रमलेल्या जोगदेव ह्यांचं २९ फेब्रुवारी २०२४ रोजी निधन झालं. ऑलिम्पिकचे वृत्तांकन करणारे  ते पहिले मराठी पत्रकार. खो-खो, कबड्डी, कुस्ती ह्या देशी खेळांवर त्यांनी भरभरून लिहिलं. त्यांच्या काही आठवणी... ------------------ ‘संपादकऽऽऽ’! अधिकृतरीत्या साधा उपसंपादक नसतानाही अशी थेट ‘बढती’ देत, बहुमानाने संबोधणारे आणि बोलावणारे दोघे होते. ‘क्रीडांगण’मध्ये काम करीत असतानाची ही गोष्ट आहे. पहिले होते, ‘प्रेस्टिज’चे सर्वेसर्वा सर्जेराव घोरपडे. दुसरे क्रीडा पत्रकार, समीक्षक श्री. हेमंत जोगदेव. त्या संबोधनात कोठेही गंमत, चेष्टा नव्हती. असलंच तर किंचित कौतुक होतं. हेमंत जोगदेव नाव ऐकलेलं होतं. ‘केसरी’मध्ये त्यांनी लिहिलेलं वाचलं होतं. ‘क्रीडांगण’मध्ये लिहिण्यासाठी त्यांना पहिल्यांदा पत्र लिहिलं ते श्री. घोरपडे ह्यांच्या सांगण्यावरून. पत्रकारनगरमध्ये राहायचे ते. साधं पोस्टकार्ड तेव्हा दुसऱ्या दिवशी मिळायचं. असं पत्र मिळालं की, तिसऱ्या दिवशी श्री. जोगदे...
html