मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

गावरान-मेवा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भुवीचे पुनरागमन, जर्सी नंबर ७८

भुवनेश्वरकुमार - सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य ः आयसीसी) ----------------------- भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी. नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली...

हुरडा... अस्सल गावरान मेवा

ज्वारीचं पीक. ह्याच कणसांचा होतो हुरडा. ती फार कोवळी नसावीत किंवा निबरही ............. थंडीचा मोसम सुरू झाला की वेध लागतात शेतातल्या गरमागरम हुरड्याचे. बदलत्या काळासोबत हुरडा खाण्याची पद्धत, स्वरूप बदलले. शेतामध्ये आगटीत भाजलेल्या अस्सल हुरड्याची चव आणि लज्जत आजही खुणावणारी. अशाच एका मळ्यात आठ-नऊ वर्षांपूर्वी रंगलेला हुरड्याचा बेत. त्याची चव एवढ्या वर्षांनीही जिभेवर आहे. -------------- मोसम थंडीचा आहे आणि मोसम हुरड्याचाही आहे. थंडीनं ह्या आठवड्यात   दडी मारली. संक्रांतीनंतर तिळातिळानं घटते थंडी ;  यंदा ती रेवड्या-रेवड्यानं कमी झाली !  असं असलं तरी हुरडा खाण्याची मजा अजून कमी झालेली नाही. सकाळच्या कोवळ्या उन्हात किंवा दिवस कलताना शेतात बसून हुरडा खाण्याचा अनुभव घ्यायलाच हवा असा असतो. फेसबुक, ब्लॉग, वृत्तपत्रे, नियतकालिके यांमधून गेल्या १० वर्षांमध्ये हुरड्यावर बऱ्याच जणांनी बरंच काही लिहिलं. त्यात स्मृतिरंजन होतं, ‘ गेले ते दिन गेले... ’ चा हळवा सूर होता. हे असं लिहिणारे प्रामुख्याने आता ५० ते ७० वयोगटात मोडणारे. त्यातल्या बऱ्याच जणांनी स्वतःच्या मळ्यात किंवा वाटेक...
html