अभिजित दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा... ----------------------------------- ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना ? की ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे बोलायला मिळणं आनंददायक ? ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय ? तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत. ... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच ! कूल... नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे. खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे ! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश मिळ...
‘ टायगर अभी ज़िंदा है... ’ द. आफ्रिकेविरुद्धच्या एक दिवशीय सामन्यांच्या मालिकेत हे दोघांनी दाखवून दिलं - रोहित आणि विराट. रो-को जोडीचा खेळ निर्विवाद आणि प्रतिस्पर्ध्याला गप्प करणारा. ----------- रोक सको तो रोक लो... तीन सामन्यांमध्ये दोन शतकं! ............ मायदेशात कसोटी मालिका गमावल्यानंतर पंधरवड्याच्या आतच भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एक दिवशीय सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर (की निवृत्ती घ्यायला लावल्यानंतर ? ) विराट कोहली आणि रोहित शर्मा पहिल्यांदाच भारतात खेळले. अजून दोन वर्षांनी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी हे दोघे संघात असतील का नाही ? चर्चेचा हा मोठा विषय. पण ह्या मालिकेतील तिन्ही सामन्यांतून त्यांनी आपल्या बॅटने ह्या चर्चेला चोख उत्तर दिले आहे. ह्या मालिकेवर त्यांचीच ठळक छाप उमटली. मालिकेतील पहिले दोन सामने तुलनेने चुरशीचे झाले. रायपूरच्या लढतीत साडेतीनशेच्या पार जाऊनही भारताला पराभव चाखावा लागला. त्यामुळेच विशाखापट्टणम येथे आज झालेला सामना निर्णायक होता. तो अगदीच एकतर्फी झाला. त्याचे श्रेय आधी कुलदीप यादवला आणि नंतर मैदानात उ...