मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

१९७१ इंग्लंड दौरा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

'वर' बांधलेल्या गाठी आणि हुकलेल्या गाड्या!

‘त्या गाठी’ तिथे कोठे तरी ‘वर’ बांधल्या जातात म्हणे. काही वेळा ती गाठ अतिशय मुलायम असते, तर काही वेळा घट्ट बांधली जाते. त्यावर नंतरचे आयुष्य स्वर्ग ठरते की नरक, हे अवलंबून असते. अर्थात त्याचा गाठीच्या मुलायमपणाशी किंवा घट्टपणाशी संबंध असतोच, असे ठामपणे म्हणता येणार नाही... हे सर्व तत्त्वज्ञान (ओढून-ताणून) इथे आणणे विनाकारण नसून सबल कारणपरत्वे आहे. लग्नाला कितीही वर्षं झाली तरी बाईची माहेरपणाची ओढ काही संपत नाही. माहेरपेक्षा दुप्पट वर्षं सासरी राहिल्यानंतरही एखादी बाई नवऱ्याला ‘आमच्या घरी अशी पद्धत नव्हती बाई...’ असं सांगते, तेव्हा त्यातला वाच्यार्थ नव्हे तर लक्ष्यार्थ लक्षात घ्यायचा असतो. त्या वाच्यार्थातही तुम्ही लक्ष्य असता, ही गोष्ट वेगळी... काही कामानिमित्त अशाच काही महिला आपल्या मूळच्या गावी आल्या होत्या. ते काहींचे माहेर, काहींचे सासर, तर एखादीचे सासर आणि माहेरही! त्यामुळे गप्पांचा सूर ‘नदीच्या पल्याड बाई झाडी लई दाट तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट...’ असा सारा गदगद झालेला. त्यांनी पाहिलेलं, अनुभवलेलं गाव आता स्वाभाविकच तसं राहिलं नव्हतं. पण त्यांच्या आठवणीत तेच जुनं चित्र असणं स्...

अजित वाडेकरांची न मिळताच झालेली मुलाखत!

अजित वाडेकर यांची कधी भेट होईल , हे स्वप्नातही आलं नव्हतं. तसं स्वप्नही पाहिलंही नव्हतं.  पण भेट होणं , त्यांच्याशी दोन-पाच मिनिटं बोलणं माझ्या नशिबात सटवाईनं लिहून ठेवलेलं होतं. ज्यासाठी गेलो ती मुलाखत मिळाली नाही; पण संवाद झाला. तीच ही मर्मबंधातली ठेव. ..................... स्वातंत्र्यदिन संपता संपता रात्री उशिरा बातमी कळली - अजित वाडेकर गेले. ते त्या अर्थाने माझ्या पिढीचे नायक क्रिकेटपटू नाहीत. आवडीनं क्रिकेट पाहायला - म्हणजे आकाशवाणीवरची कॉमेंटरी ऐकायला नि वृत्तपत्रांतल्या बातम्या वाचायला शिकलो , तेव्हा वाडेकर खेळत नव्हते.  कॉमेंटरीमधले धावांचे आकडे सोडले , तर बाकी काही कळायचं नाही, तेव्हाची गोष्ट सांगतोय.  तर वाडेकरांनी तेव्हा निवृत्ती जाहीर केली होती. अगदी नुकतीच. इंग्लंडचा  ‘ तो ’  दौरा संपला होता. सर्व बाद   ४२   असा  ‘ पराक्रम ’  भारताच्या नावावर नोंदला गेला तो ह्याच कुप्रसिद्ध दौऱ्यात. वाडेकर-बेदी वाद सुरू झाले म्हणतात , ते ह्याच दौऱ्यात. बरंच वाईट लिहिलं जात होतं, ते ह्याच दौऱ्याबद्दल. बॅटच्या स्वरूपातील विजय स्तंभावर दगडफे...
html