मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

इंदिरा गांधी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

दोन रजत कमळांचा ‘अभिजात’ मानकरी ‘अभिजित’

अभिजित दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा... ----------------------------------- ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना ? की ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे बोलायला मिळणं आनंददायक ? ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय ? तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत. ... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच ! कूल... नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे. खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे ! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश मिळ...

‘बाई’ आणि ‘भाई’

राजकीय रंगभूमीवरचे दोन हुकमी एक्के. महानायक आणि महानायिका. दोन पिढ्यांचा वारसा सांगणाऱ्या 'बाई'. शून्यातून विश्व निर्माण केलेले 'भाई'. विचारसरणी, काळ वेगळा; जनमानसावर गारुड करण्याची, सत्ता राबवण्याची शैली मात्र तीच! २०१५मध्ये लिहिलेला हा लेख आजही तेवढाच ताजा वाटेल. ह्या दोन दिग्गजांची तुलना करणारा मराठी पत्रकारितेतील (बहुदा) पहिला लेख... ------------------ आपल्याला राजकारण कळतंय , असा (गैर)समज झाल्यापासून एकच नाव ऐकत आलो. त्यांना सारे  ‘ बाई ’   म्हणत. प्रेमाने , आदराने , भीतीने , उपहासाने , तुच्छतेने. असे म्हणण्यामागे काहींची भावना त्यांना देवपण देण्याची आणि काहींची अनुल्लेखाने मारण्याच्या गंडाची. आपल्याला राजकारणाचा कंटाळा आलाय , असा (पुन्हा) (गैर)समज झाल्यापासून एकच नाव ऐकत आलो. त्यांना सारे  ‘भा ई ’   म्हणतात. प्रेमाने , आदराने , भीतीने , उपहासाने , तुच्छतेने. असे म्हणण्यामागे काहींची भावना त्यांना देवपण देण्याची आणि काहींची अनुल्लेखाने मारण्याच्या गंडाची. आधी  ‘ बाई ’   आणि आता  ‘भा ई ’ . जगातली सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या (हे प्रत्ये...