मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सफदर हाशमी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

'वर' बांधलेल्या गाठी आणि हुकलेल्या गाड्या!

‘त्या गाठी’ तिथे कोठे तरी ‘वर’ बांधल्या जातात म्हणे. काही वेळा ती गाठ अतिशय मुलायम असते, तर काही वेळा घट्ट बांधली जाते. त्यावर नंतरचे आयुष्य स्वर्ग ठरते की नरक, हे अवलंबून असते. अर्थात त्याचा गाठीच्या मुलायमपणाशी किंवा घट्टपणाशी संबंध असतोच, असे ठामपणे म्हणता येणार नाही... हे सर्व तत्त्वज्ञान (ओढून-ताणून) इथे आणणे विनाकारण नसून सबल कारणपरत्वे आहे. लग्नाला कितीही वर्षं झाली तरी बाईची माहेरपणाची ओढ काही संपत नाही. माहेरपेक्षा दुप्पट वर्षं सासरी राहिल्यानंतरही एखादी बाई नवऱ्याला ‘आमच्या घरी अशी पद्धत नव्हती बाई...’ असं सांगते, तेव्हा त्यातला वाच्यार्थ नव्हे तर लक्ष्यार्थ लक्षात घ्यायचा असतो. त्या वाच्यार्थातही तुम्ही लक्ष्य असता, ही गोष्ट वेगळी... काही कामानिमित्त अशाच काही महिला आपल्या मूळच्या गावी आल्या होत्या. ते काहींचे माहेर, काहींचे सासर, तर एखादीचे सासर आणि माहेरही! त्यामुळे गप्पांचा सूर ‘नदीच्या पल्याड बाई झाडी लई दाट तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट...’ असा सारा गदगद झालेला. त्यांनी पाहिलेलं, अनुभवलेलं गाव आता स्वाभाविकच तसं राहिलं नव्हतं. पण त्यांच्या आठवणीत तेच जुनं चित्र असणं स्...

पुस्तकांच्या वाटेवरचा प्रवास

  संग्रहात वेळोवेळी अशी पुस्तकांची भर पडत राहाते. ............ आपल्याकडं स्वतःची पुस्तकं असावीत, त्याच्या पहिल्या पानावर मालकी सांगणारी आपली सही असावी, अमूक एक पुस्तक संग्रहात आहे, हे अभिमानानं सांगता यावं, असं नेमकं कधीपासून वाटायला लागलं? ...पुस्तकवाटेवरचा उलगडलेला प्रवास. ------------ ------------ ------------ एखादी कविता आपल्या वाचण्यात खूप उशिरा येते. कवीला त्यातनं जे सांगायचं आहे, ते मात्र आधीच कधी तरी माहीत होऊन गेलेलं असतं; नकळतपणे जाणवतं. ती कविता अशीच कधी तरी ‘भेटते’, तेव्हा आनंद होतो खरा; पण तो नवं काही गवसल्याचा नसतो. समानधर्मा सापडल्याची खुशी असते ती. किंवा ह्यानं अगदी आपल्या मनातलंच कसं मांडलंय, असं वाटतं. अरेच्चा, आपल्याही खूप आधी कुणाला तरी हे सुचलेलं होतं, असं मनाशी म्हणतो. सफदर हाशमी ह्यांच्या ‘किताबें’ कवितेची गोष्ट अशीच. लेखक-कवी दासू वैद्य ह्यांनी केलेला ‘किताबें’चा अनुवाद १९९०च्या दशकात दैनिक लोकमतने मोठ्या देखण्या पद्धतीनं छापला. डाव्या बाजूला चार-पाच-सहा शब्दांच्या ओळींमागून ओळी, पुस्तकाची महती सांगणाऱ्या. आणि उजवीकडे पुस्तकांचा ढीग रेखाटलेला. त्यावर ज...
html