‘त्या गाठी’ तिथे कोठे तरी ‘वर’ बांधल्या जातात म्हणे. काही वेळा ती गाठ अतिशय मुलायम असते, तर काही वेळा घट्ट बांधली जाते. त्यावर नंतरचे आयुष्य स्वर्ग ठरते की नरक, हे अवलंबून असते. अर्थात त्याचा गाठीच्या मुलायमपणाशी किंवा घट्टपणाशी संबंध असतोच, असे ठामपणे म्हणता येणार नाही... हे सर्व तत्त्वज्ञान (ओढून-ताणून) इथे आणणे विनाकारण नसून सबल कारणपरत्वे आहे. लग्नाला कितीही वर्षं झाली तरी बाईची माहेरपणाची ओढ काही संपत नाही. माहेरपेक्षा दुप्पट वर्षं सासरी राहिल्यानंतरही एखादी बाई नवऱ्याला ‘आमच्या घरी अशी पद्धत नव्हती बाई...’ असं सांगते, तेव्हा त्यातला वाच्यार्थ नव्हे तर लक्ष्यार्थ लक्षात घ्यायचा असतो. त्या वाच्यार्थातही तुम्ही लक्ष्य असता, ही गोष्ट वेगळी... काही कामानिमित्त अशाच काही महिला आपल्या मूळच्या गावी आल्या होत्या. ते काहींचे माहेर, काहींचे सासर, तर एखादीचे सासर आणि माहेरही! त्यामुळे गप्पांचा सूर ‘नदीच्या पल्याड बाई झाडी लई दाट तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट...’ असा सारा गदगद झालेला. त्यांनी पाहिलेलं, अनुभवलेलं गाव आता स्वाभाविकच तसं राहिलं नव्हतं. पण त्यांच्या आठवणीत तेच जुनं चित्र असणं स्...
चौथऱ्यावर चढून एका तरुणीने तैलाभिषेक केला... अवघ्या २० सेकंदांत रुढीचे चिरे निखळले. त्यानंतर दुधाच्या अभिषेकाने 'शुद्धिकरण' करण्यात आले! एका मादीमुळे अपवित्र झालेल्या स्थानाचे शुद्धिकरण दुसऱ्या मादीच्याच दुधाने कसे होते? शनिशिंगणापूर येथील २०१५च्या घटनेच्या निमित्ताने श्रद्धा, अंधश्रद्धा आणि समतेचा परखड वेध... --------------- देव शुद्ध झाला !! आणि हो, (पुन्हा) पवित्रही झाला !! नेहमी स्वतःपुढे ‘ पुरोगामी ’ असं विशेषण आग्रहानं लावून घेणाऱ्या, ‘ डाव्या विचारांचा (एके काळचा) बालेकिल्ला ’ मानल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यातली गोष्ट आहे ही. ‘ जो जे वांछिल तो ते लाहो। प्राणिजात॥ ’ असे पसायदान मागणाऱ्या संत ज्ञानेश्वरांचा वारसा सांगणाऱ्या नेवासे तालुक्यातल्या शनिशिंगणापूरची चित्तचक्षुचमत्कारिक गोष्ट सांगतोय ही. देवाचं पावित्र्य शनिवारी (२८ नोव्हेंबर २०१५) भंग पावलं होतं. समस्त गावकऱ्यांनी रविवारी (२९ नोव्हेंबर २०१५ ) देवाला पुन्हा ते पावित्र्य मिळवून दिलं. या दोन्हींचंही कारण ‘ ती ’ होती. ती चौथऱ्यावर चढली म्हणे... शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास एक मुलगी किंव...