मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ओमरजाई लेबलसह पोस्ट दाखवत आहे

'वर' बांधलेल्या गाठी आणि हुकलेल्या गाड्या!

‘त्या गाठी’ तिथे कोठे तरी ‘वर’ बांधल्या जातात म्हणे. काही वेळा ती गाठ अतिशय मुलायम असते, तर काही वेळा घट्ट बांधली जाते. त्यावर नंतरचे आयुष्य स्वर्ग ठरते की नरक, हे अवलंबून असते. अर्थात त्याचा गाठीच्या मुलायमपणाशी किंवा घट्टपणाशी संबंध असतोच, असे ठामपणे म्हणता येणार नाही... हे सर्व तत्त्वज्ञान (ओढून-ताणून) इथे आणणे विनाकारण नसून सबल कारणपरत्वे आहे. लग्नाला कितीही वर्षं झाली तरी बाईची माहेरपणाची ओढ काही संपत नाही. माहेरपेक्षा दुप्पट वर्षं सासरी राहिल्यानंतरही एखादी बाई नवऱ्याला ‘आमच्या घरी अशी पद्धत नव्हती बाई...’ असं सांगते, तेव्हा त्यातला वाच्यार्थ नव्हे तर लक्ष्यार्थ लक्षात घ्यायचा असतो. त्या वाच्यार्थातही तुम्ही लक्ष्य असता, ही गोष्ट वेगळी... काही कामानिमित्त अशाच काही महिला आपल्या मूळच्या गावी आल्या होत्या. ते काहींचे माहेर, काहींचे सासर, तर एखादीचे सासर आणि माहेरही! त्यामुळे गप्पांचा सूर ‘नदीच्या पल्याड बाई झाडी लई दाट तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट...’ असा सारा गदगद झालेला. त्यांनी पाहिलेलं, अनुभवलेलं गाव आता स्वाभाविकच तसं राहिलं नव्हतं. पण त्यांच्या आठवणीत तेच जुनं चित्र असणं स्...

चॅम्पियन्स करंडकात अफगाणी सनसनाटी

चॅम्पियन्स करंडक २०२५ - ४ चितपट! मिरवा रे पठ्ठ्याला... इंग्लंडला हरवल्याचा आनंद साजरा करताना अफगाणिस्तानच्या नवीद ज़दरान ह्यानं अजमतुल्ला ह्याला खांद्यावरच उचलून घेतलं! (छायाचित्र सौजन्य : ‘द गार्डियन’) ................ धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघ पहिल्यापासून अठ्ठेचाळिसाव्या षट्कापर्यंत पुढेच होता. एकोणपन्नासाव्या षट्कात १० धावांनी मागे आणि अखेर आठ धावांनी पराभूत. अफगाणिस्तानचा हा विजय सनसनाटीच. त्याचं श्रेय शतकवीर ज़दरान आणि अष्टपैलू अजमतुल्ला ह्यांना!  ------------------------------------------- सामना संपला. निकाल लागला. सामन्याचा मानकरी कोण? शतकवीर इब्राहीम ज़दरान? पाच बळी घेणारा आणि ४१ धावा करणारा अजमतुल्ला ओमरजाई? निर्णय घेणं मोठं कठीण होतं. पण ज़दरानचं पारडं जड ठरलं. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत सर्वाधिक व्यक्तिगत धावा करणारा, अफगाणिस्तानला तीनशेच्या पार नेणारा ज़दरान ह्या ऐतिहासिक विजयातला सर्वांत मोलाचा खेळाडू ठरला! अफगाणिस्तानच्या सनसनाटी म्हणाव्या, अशा विजयावर शिक्कामोर्तब करणारा बळी ह्या दोघांची संयुक्त कामगिरी होती. आदिल रशीदने सर्व ताकदीनिशी लगावलेला फटका ज़दरान ह...
html