मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सराईत ठग लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भुवीचे पुनरागमन, जर्सी नंबर ७८

भुवनेश्वरकुमार - सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य ः आयसीसी) ----------------------- भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी. नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली...

खोट्या वाटणाऱ्या खऱ्या गोष्टी : सराईत ठगाचा भन्नाट अनुभव!

भेट त्याची - माझी... रोज चालता-फिरताना अनेक सराईत ठक भेटतात. जुनीच ओळख असल्याचा आव आणतात नि किरकोळ पैशांची नड भागवून घेतात. अशाच एका चतुर आणि सराईत ठगाशी वेगवेगळ्या प्रसंगी झालेली ही बोलकी पुनर्भेट... ------------ तुमच्या-माझ्या आयुष्यात अनेक खोट्या वाटणाऱ्या खऱ्या गोष्टी घडतात. चालता चालता अनुभव येतो. पण ह्या गोष्टी प्रत्येक वेळी त्या सांगितल्या जातातच, असं नाही. काही वेळा वाटतं, ‘कशाला कुणाला सांगायचं? विश्वास नाही बसणार. जाऊ द्या.’ काही वेळा त्या विसरून जातात. काही मात्र, का कुणास ठाऊक, लक्षात राहतात. तसा अनुभव पुनःपुन्हा येतो. आणि मग ते सांगितल्याशिवाय राहावत नाही.   कारण काहीच नव्हतं. पण अलीकडेच ‘त्याची’ आठवण आली. सहज. चालत असताना त्यानं दिलेले दोन अनुभव आठवले. बऱ्याच दिवसांत त्याचं दर्शन घडलं नाही, हे अचानक लक्षात आलं. त्याची भेट घडणार होती किंवा ठरावीक काळानं दिसतो, असं काही नाही. योगायोग बघा, त्यानंतर काही दिवसांतच तो भेटला. स्वातंत्र्यदिनी कार्यक्रम होता. मित्र, स्नेही, ओळखीची मंडळी भेटतात म्हणून त्या कार्यक्रमाला गेलो. रेंगाळलो होतो. बरेच जण भेटत होते. ख्याली-...
html