भुवनेश्वरकुमार... सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य - आयसीसी) ------------------ भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी.नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली ओव्हल मै...
‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार.
भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी.नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला.
त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील.
खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली ओव्हल मैदानावर पुनरागमन करणे त्याच्या नशिबी लिहिले होते.
सामन्यातले पहिले षट्क टाकण्यासाठी चेंडू भुवनेश्वरकुमारच्या हाती होता. भुवीसाठी हा संघ बहुसंख्य नव्या खेळाडूंचा. चार वर्षांत बरेच काही घडलेले, बदललेले. पण बदललेला दिसला नाही तो आपला नायक. तसाच शांत, किंचित स्मित करणारा. दिलेले काम प्रामाणिकपणे करणारा.
दलाई लामा ह्यांचे एक वाक्य आहे - Open your arms to change, but don’t let go of your values. त्यानुसार बदलाला सामोरे जाताना तो दिसला.
एक बदल मात्र ठळकपणे दिसला - भुवीच्या शर्टावरील क्रमांक. तो ७८ दिसला. भारताकडून एक दशकभर खेळताना त्याच्या पाठीवर क्रमांक दिसायचा १५. तो आता त्याच्याच पंथातील - जलदगती गोलंदाज गुरनूर ब्रार ह्याला मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमानुसार एकाच वेळी एका देशाकडून खेळणाऱ्या खेळाडूंचा जर्सी क्रमांक समान, एकच असू शकत नाही. त्यामुळे भुवनेश्वरच्या वाट्याला ७८ क्रमांक आला. त्याच्या दोन्ही अंकांची बेरीज १५ होते, हा एक गमतीचा भाग.
जर्सी क्रमांक बदललेला असू दे. भुवनेश्वर, तोच दिसावा, निर्वाणीच्या षट्कांमध्ये धावा दाबून धरणारा, नेमक्या वेळी बळी मिळवणारा.
पुनरागमनानंतरच्या पहिल्या सामन्यात पहिलं षट्क सोडलं, तर जुना भुवनेश्वरकुमार दिसला नाही. अर्थात सगळ्याच गोलंदाजांची किवी फलंदाजांनी धुलाई केली.
पुढच्या दोन सामन्यांमध्ये भुवी आपलं नाणं वाजवील, ही आशा त्याच्या चाहत्यांना आहेच. त्याचा स्विंग, अखेरच्या काही षट्कांमधले (डेथ ओव्हर) त्याचे अचूक यॉर्कर पाहण्यासाठी सगळेच आसुसलेले आहेत.
ह्या शांत, सज्जन खेळाडूला त्यासाठी शुभेच्छा...
भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी.नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला.
त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील.
खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली ओव्हल मैदानावर पुनरागमन करणे त्याच्या नशिबी लिहिले होते.
सामन्यातले पहिले षट्क टाकण्यासाठी चेंडू भुवनेश्वरकुमारच्या हाती होता. भुवीसाठी हा संघ बहुसंख्य नव्या खेळाडूंचा. चार वर्षांत बरेच काही घडलेले, बदललेले. पण बदललेला दिसला नाही तो आपला नायक. तसाच शांत, किंचित स्मित करणारा. दिलेले काम प्रामाणिकपणे करणारा.
दलाई लामा ह्यांचे एक वाक्य आहे - Open your arms to change, but don’t let go of your values. त्यानुसार बदलाला सामोरे जाताना तो दिसला.
![]() |
| पुनरागमनानंतर नव्या क्रमांकाची जर्सी. (छायाचित्र सौजन्य - एबीपी न्यूज) ------------------ |
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमानुसार एकाच वेळी एका देशाकडून खेळणाऱ्या खेळाडूंचा जर्सी क्रमांक समान, एकच असू शकत नाही. त्यामुळे भुवनेश्वरच्या वाट्याला ७८ क्रमांक आला. त्याच्या दोन्ही अंकांची बेरीज १५ होते, हा एक गमतीचा भाग.
जर्सी क्रमांक बदललेला असू दे. भुवनेश्वर, तोच दिसावा, निर्वाणीच्या षट्कांमध्ये धावा दाबून धरणारा, नेमक्या वेळी बळी मिळवणारा.
पुनरागमनानंतरच्या पहिल्या सामन्यात पहिलं षट्क सोडलं, तर जुना भुवनेश्वरकुमार दिसला नाही. अर्थात सगळ्याच गोलंदाजांची किवी फलंदाजांनी धुलाई केली.
पुढच्या दोन सामन्यांमध्ये भुवी आपलं नाणं वाजवील, ही आशा त्याच्या चाहत्यांना आहेच. त्याचा स्विंग, अखेरच्या काही षट्कांमधले (डेथ ओव्हर) त्याचे अचूक यॉर्कर पाहण्यासाठी सगळेच आसुसलेले आहेत.
ह्या शांत, सज्जन खेळाडूला त्यासाठी शुभेच्छा...
----------



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा