‘त्या गाठी’ तिथे कोठे तरी ‘वर’ बांधल्या जातात म्हणे. काही वेळा ती गाठ अतिशय मुलायम असते, तर काही वेळा घट्ट बांधली जाते. त्यावर नंतरचे आयुष्य स्वर्ग ठरते की नरक, हे अवलंबून असते. अर्थात त्याचा गाठीच्या मुलायमपणाशी किंवा घट्टपणाशी संबंध असतोच, असे ठामपणे म्हणता येणार नाही... हे सर्व तत्त्वज्ञान (ओढून-ताणून) इथे आणणे विनाकारण नसून सबल कारणपरत्वे आहे. लग्नाला कितीही वर्षं झाली तरी बाईची माहेरपणाची ओढ काही संपत नाही. माहेरपेक्षा दुप्पट वर्षं सासरी राहिल्यानंतरही एखादी बाई नवऱ्याला ‘आमच्या घरी अशी पद्धत नव्हती बाई...’ असं सांगते, तेव्हा त्यातला वाच्यार्थ नव्हे तर लक्ष्यार्थ लक्षात घ्यायचा असतो. त्या वाच्यार्थातही तुम्ही लक्ष्य असता, ही गोष्ट वेगळी... काही कामानिमित्त अशाच काही महिला आपल्या मूळच्या गावी आल्या होत्या. ते काहींचे माहेर, काहींचे सासर, तर एखादीचे सासर आणि माहेरही! त्यामुळे गप्पांचा सूर ‘नदीच्या पल्याड बाई झाडी लई दाट तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट...’ असा सारा गद् गद झालेला. त्यांनी पाहिलेलं, अनुभवलेलं गाव आता स्वाभाविकच तसं राहिलं नव्हतं. पण त्यांच्या आठवणीत तेच जुनं चित्र असणं ...
मित्रत्व बहाल करणारा गुरू अमृतमहोत्सवानिमित्त नाशिकमध्ये मानपत्र देऊन सत्कार. प्रवीण ठिपसे, विनायकदादा पाटील, वि. वि. क. आणि शांताराम जाधव. मंदार देशमुख ह्यांनी आयोजित केलेला देखणा, अविस्मरणीय सोहळा. ---------------------------------------- ------------------------------ ‘वि. वि. करमरकर यांचं वेगळेपण कशात? भाषेत? अभ्यासात? तपशिलात? शैलीत? या सगळ्याच प्रश्नांचं उत्तर अगदी थोडक्यात देता येईल - ‘सगळ्याच बाबतीत.’ त्यांची भाषा वेगळी असे; पण सर्वसामान्यांना समजणारी. लेखात-बातमीत त्यांनी केलेला अभ्यास दिसे; पण तो दडपून टाकणारा नसे. आवश्यक तेवढा तपशील ते देत; त्यांच्या लेखनाची शैली, धाटणी वेगळी होती. पण तो केवळ शब्दांचा फुलोरा नसे. या साऱ्याचा अनोखा, गुंगवून टाकणारा संगम म्हणजे वि. वि. क.’ - साधारण चौदा वर्षांपूर्वी वि. वि. करमरकर , अर्थात सर्वसामान्य क्रीडाप्रेमी वाचकांचे वि. वि. क. ह्यांचं व्यक्तिचित्र रंगवताना हे लिहिलं होतं. ‘शब्दसंवाद’ पुस्तकाची ओळख करून देताना ह. मो. मराठे ह्यांनी ते नेमकं उचलून धरलं होतं. हे लिहिलं तेव्हा वि. वि. क. ह्यांच्याशी ओळख नव्हती. म्हणजे दुहेरी नव्हती. पुण्य...