‘त्या गाठी’ तिथे कोठे तरी ‘वर’ बांधल्या जातात म्हणे. काही वेळा ती गाठ अतिशय मुलायम असते, तर काही वेळा घट्ट बांधली जाते. त्यावर नंतरचे आयुष्य स्वर्ग ठरते की नरक, हे अवलंबून असते. अर्थात त्याचा गाठीच्या मुलायमपणाशी किंवा घट्टपणाशी संबंध असतोच, असे ठामपणे म्हणता येणार नाही... हे सर्व तत्त्वज्ञान (ओढून-ताणून) इथे आणणे विनाकारण नसून सबल कारणपरत्वे आहे. लग्नाला कितीही वर्षं झाली तरी बाईची माहेरपणाची ओढ काही संपत नाही. माहेरपेक्षा दुप्पट वर्षं सासरी राहिल्यानंतरही एखादी बाई नवऱ्याला ‘आमच्या घरी अशी पद्धत नव्हती बाई...’ असं सांगते, तेव्हा त्यातला वाच्यार्थ नव्हे तर लक्ष्यार्थ लक्षात घ्यायचा असतो. त्या वाच्यार्थातही तुम्ही लक्ष्य असता, ही गोष्ट वेगळी... काही कामानिमित्त अशाच काही महिला आपल्या मूळच्या गावी आल्या होत्या. ते काहींचे माहेर, काहींचे सासर, तर एखादीचे सासर आणि माहेरही! त्यामुळे गप्पांचा सूर ‘नदीच्या पल्याड बाई झाडी लई दाट तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट...’ असा सारा गद् गद झालेला. त्यांनी पाहिलेलं, अनुभवलेलं गाव आता स्वाभाविकच तसं राहिलं नव्हतं. पण त्यांच्या आठवणीत तेच जुनं चित्र असणं ...
चित्र ‘साधं’ आहे. एका चतकोर कार्डशीटवर पॉइंट पेनाने केलेलं रेखाटण. त्यात दिसते सफाई. रेषांची गुंतागुंतही. ह्या विलक्षण मिश्रणातून आकाराला आलं आहे एक डेरेदार झाड... श्रीरंग उमराणी ह्यांचं रेखाटण. हे चित्र ‘साधं’ आहे. एका चतकोर कार्डशीटवर पॉइंट पेनाने केलेलं रेखाटण. त्यात सफाई आहे. रेषांची गुंतागुंत दिसते. ही सारी सफाई आणि गुंतागुंत ह्या मिश्रणातून आकारला आलं आहे एक डेरेदार झाड. फार उंच नाही. पण आडवं वाढलेलं. अभ्यासकांना, दर्दी मंडळींना आणि जाणकारांना ह्या चित्रात विशेष काही वाटणार नाही कदाचीत . पण आधी ‘साधं चित्र’ म्हटलं असलं, तरी ते माझ्यासाठी फार ‘स्पेशल’ आहे. चित्रकलेच्या बाबत ‘नर्मदेतला गोटा’ असूनही ते जवळपास चार दशकं जपून ठेवलेलं. ते पाहिलं की, अजूनही छान वाटतं. जुन्या आठवणी फिरून जाग्या होतात. हे चित्र आधी एका वहीवर डकवलेलं होतं. कधी तरी तिथून ते काढून व्यवस्थित ठेवलं. जेव्हा केव्हा ते पाहतो, तेव्हा त्याबद्दल लिहायचं ठरवतो. पण राहून जातं. खरं तर ते छान ‘स्कॅन’ करून इथं द्यायचं होतं. पण ते जमेना. म्हणून मोबाईलवरच त्याचं छायाचित्र काढलं. चित्राच्या उजव्या कोपऱ्यात तळाला स...