मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

श्री-एम लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भुवीचे पुनरागमन, जर्सी नंबर ७८

भुवनेश्वरकुमार - सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य ः आयसीसी) ----------------------- भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी. नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली...

श्री एम ह्यांच्याशी 'सत्संग'

अध्यात्म, योग आणि चमत्कार ह्या विषयांची आवड असणे ही वेगळी गोष्ट; पण एखादे पुस्तक वाचताना निर्माण झालेले कुतूहल थेट एका योगी पुरुषाच्या भेटीपर्यंत घेऊन जाते, तेव्हा काय घडते? 'हिमालयवासी गुरूच्या योगी शिष्याचे आत्मकथन' पुस्तकाचे लेखक श्री. एम्. ऊर्फ मुमताजअली ह्यांच्या हिवरेबाजार येथील भेटीत साधलेला सहज आणि तितकाच प्रगल्भ संवाद... ------------- हा लेख लिहायला घेतला, तेव्हा गोष्ट तशी फार जुनी झालेली नव्हती. नेमकं सांगायचं तर तेव्हा तिला दोन वर्षं नि एक महिना आणि तीन दिवस झालेले होते. म्हणजे गोष्ट घडली १३ जून २०१३ रोजी नि ती लेखाच्या स्वरूपात खिडकीमध्ये अवतरली १५ जुलै २०१५ रोजीची. गोष्ट एका पुस्तकाची आहे आणि त्यामुळे भेटलेल्या एका वेगळ्या माणसाची आहे. त्याच्या झालेल्या भेटीची आहे. मुलाचे मामा श्री. अशोक कानडे यांनी १३ जून २०१३ रोजी माझ्या वडिलांना एक पुस्तक भेट दिलं. पुस्तकाचं नाव - 'हिमालयवासी गुरुच्या योगी शिष्याचे आत्मकथन'. लेखक - श्री. एम्.. अनुवादक - श्री. वि. पटवर्धन. आवृत्ती तिसरी. पाने - ३६२. किंमत २९५ रुपये. ह्या पुस्तकाचा विषय पूर्णपणे अध्यात्माचा. अर्थातच तो ...
html