मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

किम जोंग उन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

'वर' बांधलेल्या गाठी आणि हुकलेल्या गाड्या!

‘त्या गाठी’ तिथे कोठे तरी ‘वर’ बांधल्या जातात म्हणे. काही वेळा ती गाठ अतिशय मुलायम असते, तर काही वेळा घट्ट बांधली जाते. त्यावर नंतरचे आयुष्य स्वर्ग ठरते की नरक, हे अवलंबून असते. अर्थात त्याचा गाठीच्या मुलायमपणाशी किंवा घट्टपणाशी संबंध असतोच, असे ठामपणे म्हणता येणार नाही... हे सर्व तत्त्वज्ञान (ओढून-ताणून) इथे आणणे विनाकारण नसून सबल कारणपरत्वे आहे. लग्नाला कितीही वर्षं झाली तरी बाईची माहेरपणाची ओढ काही संपत नाही. माहेरपेक्षा दुप्पट वर्षं सासरी राहिल्यानंतरही एखादी बाई नवऱ्याला ‘आमच्या घरी अशी पद्धत नव्हती बाई...’ असं सांगते, तेव्हा त्यातला वाच्यार्थ नव्हे तर लक्ष्यार्थ लक्षात घ्यायचा असतो. त्या वाच्यार्थातही तुम्ही लक्ष्य असता, ही गोष्ट वेगळी... काही कामानिमित्त अशाच काही महिला आपल्या मूळच्या गावी आल्या होत्या. ते काहींचे माहेर, काहींचे सासर, तर एखादीचे सासर आणि माहेरही! त्यामुळे गप्पांचा सूर ‘नदीच्या पल्याड बाई झाडी लई दाट तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट...’ असा सारा गदगद झालेला. त्यांनी पाहिलेलं, अनुभवलेलं गाव आता स्वाभाविकच तसं राहिलं नव्हतं. पण त्यांच्या आठवणीत तेच जुनं चित्र असणं स्...

हुकूमशहा हसण्याला घाबरतात का?

हसण्यावर अचानक कोणी बंदी आणली तर?  चेहऱ्यावर एखादी जरी स्मितरेषा दिसली तरी कठोर शिक्षेचे फर्मान! उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने घातलेल्या ह्याच अजब बंदीचा आणि मानवी हास्याच्या मानसशास्त्राचा घेतलेला रंजक व वैचारिक वेध. .......................... मनुष्यप्राण्याला हसण्याची अद्भुत देणगी मिळालेली आहे म्हणतात. ह्या देणगीचं रहस्य शोधण्यासाठी खूप संशोधन झालं, चालू आहे. त्यातून काही निष्कर्ष संशोधकांनी काढले आहेत. हसण्याचे खूप फायदे सांगितले जातात नि कारणंही. का हसतो माणूस - एखादा विनोद झाला म्हणून? कुणाची फजिती झाल्यामुळं? ही दोन्ही कारणं खरी असली, तरी ती तेवढीच नाहीत. हसणं संवादाचं एक साधन आहे. चेहऱ्यावर फुलणारं हसू समाजातील नातेसंबंध वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं, असं संशोधक-अभ्यासकांचं मत आहे. हसू बऱ्याच वेळा भावनांचं दर्शन घडवतं, असं म्हणतात. हसण्याने ताण हलका होतो, मन मोकळं होतं. सिग्मंड फ्रॉईड ह्यांनी म्हटलंय की, 'हसण्यामुळे मानसिक कोंडी दूर होते. मनावरचं दडपण आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते.' हसणं आरोग्यासाठी चांगलं आहे, असं मानलं जातं.  ...तर ह्या हसण्यावर अचानक कुणी बंदी आणली तर? अमू...
html