‘त्या गाठी’ तिथे कोठे तरी ‘वर’ बांधल्या जातात म्हणे. काही वेळा ती गाठ अतिशय मुलायम असते, तर काही वेळा घट्ट बांधली जाते. त्यावर नंतरचे आयुष्य स्वर्ग ठरते की नरक, हे अवलंबून असते. अर्थात त्याचा गाठीच्या मुलायमपणाशी किंवा घट्टपणाशी संबंध असतोच, असे ठामपणे म्हणता येणार नाही... हे सर्व तत्त्वज्ञान (ओढून-ताणून) इथे आणणे विनाकारण नसून सबल कारणपरत्वे आहे. लग्नाला कितीही वर्षं झाली तरी बाईची माहेरपणाची ओढ काही संपत नाही. माहेरपेक्षा दुप्पट वर्षं सासरी राहिल्यानंतरही एखादी बाई नवऱ्याला ‘आमच्या घरी अशी पद्धत नव्हती बाई...’ असं सांगते, तेव्हा त्यातला वाच्यार्थ नव्हे तर लक्ष्यार्थ लक्षात घ्यायचा असतो. त्या वाच्यार्थातही तुम्ही लक्ष्य असता, ही गोष्ट वेगळी... काही कामानिमित्त अशाच काही महिला आपल्या मूळच्या गावी आल्या होत्या. ते काहींचे माहेर, काहींचे सासर, तर एखादीचे सासर आणि माहेरही! त्यामुळे गप्पांचा सूर ‘नदीच्या पल्याड बाई झाडी लई दाट तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट...’ असा सारा गदगद झालेला. त्यांनी पाहिलेलं, अनुभवलेलं गाव आता स्वाभाविकच तसं राहिलं नव्हतं. पण त्यांच्या आठवणीत तेच जुनं चित्र असणं स्...
चॅम्पियन्स करंडक २०२५ - १ विजयावर शिक्कामोर्तब झालं बुवा! यजमान पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर आनंद व्यक्त करणारे न्यू झीलँडचे खेळाडू. ................ फार वाट पाहायला लावून चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेची नवी आवृत्ती अखेर सुरू झाली. सलामीच्या लढतीतच यजमान पाकिस्तानला पराभव पचवावा लागला. ब्लॅक कॅप्सनं शानदार सांघिक खेळ केला. पाकिस्तानच्या तळाच्या फलंदाजांनी केलेली आतषबाजी आकर्षक खरी; पण सामन्याच्या निकालावर परिणाम न करणारी! ----------------- विजेतेपदाच्या शिखरावरून पराभवाच्या गर्तेत! चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या पाकिस्तानची ही कहाणी. स्पर्धेतील सलामीचा सामना कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये बुधवारी (१९ फेब्रुवारी २०२५) खेळला गेला. त्यात न्यू झीलँडनं यजमानांना ६० धावांनी हरवलं. (किती टीव्ही. संच त्यामुळे फुटले असतील बरं!) पहिल्याच घासाला खडा लागला, हे खरं. मागच्या (२०१७) स्पर्धेतही असंच झालं होतं. पहिल्या सामन्यात भारताकडून सव्वाशे धावांनी पराभूत झालेल्या पाकिस्ताननं नंतर उचल खाल्ली. पुढच्या लढतींत उत्तम खेळ करीत करंडक जिंकला. तोही पारंपरिक प्रतिस्पर्ध्यावरच दणद...