मुख्य सामग्रीवर वगळा

'वर' बांधलेल्या गाठी आणि हुकलेल्या गाड्या!

‘त्या गाठी’ तिथे कोठे तरी ‘वर’ बांधल्या जातात म्हणे. काही वेळा ती गाठ अतिशय मुलायम असते, तर काही वेळा घट्ट बांधली जाते. त्यावर नंतरचे आयुष्य स्वर्ग ठरते की नरक, हे अवलंबून असते. अर्थात त्याचा गाठीच्या मुलायमपणाशी किंवा घट्टपणाशी संबंध असतोच, असे ठामपणे म्हणता येणार नाही... हे सर्व तत्त्वज्ञान (ओढून-ताणून) इथे आणणे विनाकारण नसून सबल कारणपरत्वे आहे. लग्नाला कितीही वर्षं झाली तरी बाईची माहेरपणाची ओढ काही संपत नाही. माहेरपेक्षा दुप्पट वर्षं सासरी राहिल्यानंतरही एखादी बाई नवऱ्याला ‘आमच्या घरी अशी पद्धत नव्हती बाई...’ असं सांगते, तेव्हा त्यातला वाच्यार्थ नव्हे तर लक्ष्यार्थ लक्षात घ्यायचा असतो. त्या वाच्यार्थातही तुम्ही लक्ष्य असता, ही गोष्ट वेगळी... काही कामानिमित्त अशाच काही महिला आपल्या मूळच्या गावी आल्या होत्या. ते काहींचे माहेर, काहींचे सासर, तर एखादीचे सासर आणि माहेरही! त्यामुळे गप्पांचा सूर ‘नदीच्या पल्याड बाई झाडी लई दाट तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट...’ असा सारा गदगद झालेला. त्यांनी पाहिलेलं, अनुभवलेलं गाव आता स्वाभाविकच तसं राहिलं नव्हतं. पण त्यांच्या आठवणीत तेच जुनं चित्र असणं स्...

'वर' बांधलेल्या गाठी आणि हुकलेल्या गाड्या!

साड्या नेसून एकत्र बसलेल्या आणि चहा घेत गप्पा मारणाऱ्या पाच मराठी मैत्रिणींचे जलरंगातील चित्र.

‘त्या गाठी’ तिथे कोठे तरी ‘वर’ बांधल्या जातात म्हणे. काही वेळा ती गाठ अतिशय मुलायम असते, तर काही वेळा घट्ट बांधली जाते. त्यावर नंतरचे आयुष्य स्वर्ग ठरते की नरक, हे अवलंबून असते. अर्थात त्याचा गाठीच्या मुलायमपणाशी किंवा घट्टपणाशी संबंध असतोच, असे ठामपणे म्हणता येणार नाही...

हे सर्व तत्त्वज्ञान (ओढून-ताणून) इथे आणणे विनाकारण नसून सबल कारणपरत्वे आहे. लग्नाला कितीही वर्षं झाली तरी बाईची माहेरपणाची ओढ काही संपत नाही.

माहेरपेक्षा दुप्पट वर्षं सासरी राहिल्यानंतरही एखादी बाई नवऱ्याला ‘आमच्या घरी अशी पद्धत नव्हती बाई...’ असं सांगते, तेव्हा त्यातला वाच्यार्थ नव्हे तर लक्ष्यार्थ लक्षात घ्यायचा असतो. त्या वाच्यार्थातही तुम्ही लक्ष्य असता, ही गोष्ट वेगळी...

काही कामानिमित्त अशाच काही महिला आपल्या मूळच्या गावी आल्या होत्या. ते काहींचे माहेर, काहींचे सासर, तर एखादीचे सासर आणि माहेरही! त्यामुळे गप्पांचा सूर
‘नदीच्या पल्याड बाई झाडी लई दाट
तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट...’

असा सारा गदगद झालेला.

त्यांनी पाहिलेलं, अनुभवलेलं गाव आता स्वाभाविकच तसं राहिलं नव्हतं. पण त्यांच्या आठवणीत तेच जुनं चित्र असणं स्वाभाविक.

त्या मिळून साऱ्या जणींमधल्या एकीचं हे गाव ना सासर, ना माहेर. कामानिमित्त त्या इथे आलेल्या. त्यांनी गंमत सांगितली. त्यांचे एक कौटुंबिक स्नेही खूप खूप वर्षांपूर्वी ह्या गावात स्थायिक झाले. व्यवसाय सुरू केला, वाढविला आणि स्थिरावले. त्यांना ह्या बाई व त्यांची भावंडे ‘मामा’ म्हणत. अगदी सख्ख्या मामासारखेच...

मामांचा ताईला आग्रह असा की, ‘एक तरी मुलगी ह्या गावात दे.’ म्हणजे आपल्या (मूळ) गावचं कोणी तरी येथे आहे, ह्याचा दिलासा. मामा वेळ काढून मूळ गावी गेले की, ताईपुढे स्थळांची यादी टाकत.

गालावर हात ठेवून हुकलेल्या गाडीचा किस्सा कौतुकाने आणि हसतमुखाने ऐकणारी मराठी महिला.
एकदा मामांनी असंच एक स्थळ सुचवलं. त्यांना आवडलं, इकडे ह्यांनाही आवडलं. तिकडून पत्रसंपर्क साधण्यात थोडा उशीर झाला.  (‘त्या वेळी मोबाईल नव्हते ना,’ असं आता कोणत्याही आठवणींच्या मजकुरात लिहिणं बंधनकारकच असतं म्हणे! 😕) दरम्यानच्या काळात तिकडून पत्र आलं, त्याच्या आदल्याच दिवशी बाईंचा साखरपुडा झाला होता. ह्या गावाची त्यांची गाडी हुकलीच...

मग मामांनी सून तरी इकडची करावी, असा लकडा लावला. पण तेही काही जमलं नाही. तिथे ‘वर’ गाठी बांधणाऱ्यानं ह्या आणि त्या गावाची गाठ बांधायचीच नाही, असा जणू चंग बांधला होता.

गटात आणखी एक मॅडम होत्या. हे गाव त्यांचं माहेर नव्हे, तर सासर. पण त्यांना ते माहेराएवढंच प्रेम. त्याचा किस्सा सांगितला त्यांनी.

ह्या बाई महानगरात राहणाऱ्या. त्यांच्या आई-वडिलांना ह्या गावचं स्थळ समजलं. बाबांना वेळ नव्हता म्हणून कांदे पोह्याच्या कार्यक्रमासाठी त्या आणि आई अशा दोघीच आल्या. साधारण तीन दशकांपूर्वीच्या ह्या गावातील मुलाकडच्या मंडळींना तो सांस्कृतिक धक्काच होता - ‘एवढ्या महत्त्वाच्या कामासाठी’ एवढ्या लांबन फक्त आई आणि मुलगी दोघीच येतात? फारच ‘धाडशी’ बुवा, ह्या मोठ्ठ्या शहरातल्या स्त्रिया!

केसात गजरा माळलेली आणि हातवारे करत मजेशीर किस्सा सांगणारी हसरी मराठी महिला.
कांदे पोह्यात तिथे  पोहे फारसे नरम झालेले नसावेत. परत निघण्यापूर्वी ह्या आई-मुलीला अजून एक स्थळ जवळच असल्याचं समजलं. आलोच आहोत एवढ्या लांब आठ-दहा तासांचा प्रवास करून, तर तिथेही जाऊन येऊ, असं त्यांनी ठरवलं. ‘एका दगडात एकच पक्षी’ मारायचा असला, तरी दुसरा पाहायला काही हरकत नव्हती.

त्या घरातल्या मंडळींना ह्या ‘धाडशी’ आई-मुलीचं भलतंच कौतुक वाटलं.
त्यांनी लगेच पसंतीचं शिक्कामोर्तब केलं.
‘ये मोह मोह के धागे तेरी उँगलियों से जा उलझे...’
असंच काही तरी झालं!
बाईंच्या नशिबी ह्याच गावचं सासर तिथं ठरवून दिलेलं होतं...

थोडक्यात काय, तर गाठी त्या तिथे अशा बांधल्या जातात... आणि त्या गाठींचे अनमोल धागे असे ऋणानुबंध जोडतात!
..............
#खोट्या_वाटणाऱ्या_खऱ्या_गोष्टी
-----------

  • सतीश स. कुलकर्णी | Copyright © खिडकी
-----------
(लेखातील सर्व प्रातिनिधिक चित्रे Copilot ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘ळ’च्या अढळपदासाठी

  रचना - शब्दकुल ---------- हा लढा केवळ एका अक्षराचा नाही. मराठीच्या अस्मितेचे अढळपद टिकवून ठेवण्याचा संघर्ष आहे.  'तिलक' किंवा 'जलगाव' ही मोडतोड थांबविण्यासाठी पुण्याच्या श्री. प्रकाश निर्मळ ह्यांनी केंद्रीय मंत्रालयांपर्यंत चिवट पाठपुरावा केला. केंद्रीय हिंदी संचालनालयाने अखेर विस्तारित वर्णावलीत 'ळ'  स्वीकारला. ऋग्वेदापासून ते आधुनिक उपबोलींपर्यंत ५० कोटी जनतेच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या 'ळ' अक्षराची ही रंजक भाषिक यात्रा. सोबत प्रकाश निर्मळ ह्यांची मुलाखत... ---------------- ‘ ध ’ चा ‘ मा ’ केल्यानं काय होतं, हे मराठी माणसाला चांगलं माहीत आहे. ते ऐतिहासिक सत्य आहे. म्हणजे अक्षरांतर इतिहास घडवतं ! इतिहासाचा हा धडा आपण शिकलो, पण गिरवला नाही, असंच दिसत होतं. वर्तमानात ‘ ळ ’ चा ‘ ल ’ केला जात होता आणि ‘ च ल ता है... ’ अशी आपली त्याबाबतची वृत्ती होती. लोकमान्यांचं टिळक आडनाव हिंदीत बनायचं ‘ ति ल क ’ . बाळासाहेब ठाकरे ह्यांचं नाव हिंदी माध्यमांतून व्हायचं ‘ बाला साहब ’ . नाशिक जिल्ह्यात आहे मालेगाव आणि पुणे जिल्ह्यातलं ते माळेगाव. पण हिंदीत गेली की, दोन्...

दोन रजत कमळांचा ‘अभिजात’ मानकरी ‘अभिजित’

अभिजित दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा... ----------------------------------- ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना ? की ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे बोलायला मिळणं आनंददायक ? ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय ? तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत. ... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच ! कूल... नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे. खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे ! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश मिळ...

पहिला फोटो, 'केसरी' आणि ५१ रुपयांचे बक्षीस

स्वतःचा पहिला फोटो छापून येणं आणि शिवाय त्यासोबत बक्षीसही. किती मोठी गोष्ट होती ती त्या काळातली आणि आजचीही! दैनिक केसरीमध्ये लिहिलेलं वाचकाचं पत्र आणि त्याची त्या महिन्यातली सर्वोत्तम पत्र म्हणून झालेली निवड. बरोब्बर ४० वर्षांपूर्वी - ९ सप्टेंबर १९८६! ----------- ‘ लवकर उठायचंच आज ’ असा निश्चय करून ( नेहमीप्रमाणेच) उशिरा उठलो. सगळं आवरून दुपारच्या सुमारास कार्यालयात गेलो. ‘ शतायुषी ’ दिवाळी अंकात संपादकीय सहायक म्हणून काम करायला सुरुवात झाली होती. ‘ पत्रकार ’ ह्या नात्यानं पहिली नोकरी. हल्लीच्या भाषेत सांगायचं तर ‘ कॅम्पस इंटरव्ह्यू ’ मधून निवड झालेली होती माझी. परीक्षेचा निकाल लागण्याच्या आधीच. संज्ञापन व वृत्तविद्या विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्र. ना. परांजपे ह्यांचे घरच्या पत्त्यावर कार्ड आले होते - ‘ एका दिवाळी अंकाच्या संपादकांना सहायकाची गरज आहे. तुम्हाला रस असेल तर कार्यालयीन वेळेत भेटायला यावे. ’ (ते पोस्टकार्ड अजून संग्रहात आहे.😅) कसा कोणास ठाऊक, पण प्र. ना. ह्यांचा मी बऱ्यापैकी लाडका विद्यार्थी होतो. त्यामुळेच त्यांना ह्या जागेसाठी माझी आठवण झाली. त्या दिवशी त्यांनी...
html