मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

उपरोध (Satire) लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भुवीचे पुनरागमन, जर्सी नंबर ७८

भुवनेश्वरकुमार - सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य ः आयसीसी) ----------------------- भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी. नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली...

शुध्द साहीत्य वैगेरे वैगेरे...

‘साहित्याचा आणि शुद्धलेखनाचा संबंधच काय?’ हा प्रश्न अतिशय उद्दाम नम्रतेने विचारण्याचे डिजिटल युग सांप्रत आहे. त्यात बागडणाऱ्यांना हा जुना लेख फार जुना ऽऽ ट वाटण्याची शक्यता आहेच आहे. पण तरीही, त्या आरशात पाहायला हरकत नाही. कारण नामांकित साहित्य पुरस्काराच्या प्रसिद्धिपत्रकातील ही शब्दरॅली आहे! विचार करायला लावणारी... ------------------ फार्फार वर्षांपूर्वी, म्हणजे वीस-एक वर्षांपूर्वी `रुची` मासिकानं (आता त्याचं नाव `शब्द रुची` असं झालंय का? की तेव्हाही ते असंच होतं?) मुखपृष्ठावर एक धम्माल केली होती. म्हणजे मुखपृष्ठावर एक पत्रच छापलं होतं. आणि त्या पत्रातल्या शुद्धलेखनाच्या चुका दाखवून दिल्या होत्या. सध्या साहित्यक्षेत्रामध्ये अनेकांसाठी `नायक` आणि तेवढ्याच जणांसाठी `खलनायक` असलेल्या प्रा. कौतिकराव ठाले पाटील यांनी त्या चुका दाखवून दिल्या होत्या. हे म्हणजे अगदीच सौम्य भाषेत झालं. खरं सांगायचं तर ठाले पाटलांनी ते पत्र लिहिणाऱ्याची अगदी `बिनपाण्यानं तासली` होती. साहित्य क्षेत्रातील एका (आता) मानाच्या (झालेल्या) पुरस्कारासंबंधी काही आवाहन करणारं ते पत्र होतं. ते लिहिणारा एक प्राध्...
html