मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

माध्यम विश्लेषण लेबलसह पोस्ट दाखवत आहे

'वर' बांधलेल्या गाठी आणि हुकलेल्या गाड्या!

‘त्या गाठी’ तिथे कोठे तरी ‘वर’ बांधल्या जातात म्हणे. काही वेळा ती गाठ अतिशय मुलायम असते, तर काही वेळा घट्ट बांधली जाते. त्यावर नंतरचे आयुष्य स्वर्ग ठरते की नरक, हे अवलंबून असते. अर्थात त्याचा गाठीच्या मुलायमपणाशी किंवा घट्टपणाशी संबंध असतोच, असे ठामपणे म्हणता येणार नाही... हे सर्व तत्त्वज्ञान (ओढून-ताणून) इथे आणणे विनाकारण नसून सबल कारणपरत्वे आहे. लग्नाला कितीही वर्षं झाली तरी बाईची माहेरपणाची ओढ काही संपत नाही. माहेरपेक्षा दुप्पट वर्षं सासरी राहिल्यानंतरही एखादी बाई नवऱ्याला ‘आमच्या घरी अशी पद्धत नव्हती बाई...’ असं सांगते, तेव्हा त्यातला वाच्यार्थ नव्हे तर लक्ष्यार्थ लक्षात घ्यायचा असतो. त्या वाच्यार्थातही तुम्ही लक्ष्य असता, ही गोष्ट वेगळी... काही कामानिमित्त अशाच काही महिला आपल्या मूळच्या गावी आल्या होत्या. ते काहींचे माहेर, काहींचे सासर, तर एखादीचे सासर आणि माहेरही! त्यामुळे गप्पांचा सूर ‘नदीच्या पल्याड बाई झाडी लई दाट तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट...’ असा सारा गदगद झालेला. त्यांनी पाहिलेलं, अनुभवलेलं गाव आता स्वाभाविकच तसं राहिलं नव्हतं. पण त्यांच्या आठवणीत तेच जुनं चित्र असणं स्...

मराठीतली नि इंग्रजीतली बातमी

डिजिटल युगात वृत्तपत्रांमधील 'गोळीबंद लीड'ची जागा रंजक आणि विश्लेषणात्मक मांडणीने घेतली आहे. हा बदल मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रांनी स्वीकारला आहे का? ह्या दोन भाषांमधील दैनिकांची बातमी देण्याची धाटणी कशी वेगळी असते, हे उलगडून दाखवणारा सप्रमाण लेख. -------------- ‘वागशीर’ला जलावतरणानिमित्त तुताऱ्यांनी सलामी. (छायाचित्र नौदलाच्या संकेतस्थळावरून साभार.) ................. बातमी म्हणजे काय? तिची व्याख्या? पत्रकारितेचं औपचारिक शिक्षण घेणाऱ्यांना आठवेल कदाचित की, ‘बातमी’ आणि ‘बातमी-लेखन’ विषय शिकविणाऱ्या कोण्या मुरब्बी पत्रकारानं त्यांना पहिल्याच तासाला हा प्रश्न विचारला असेल. त्यानंतर पाच-सहा-सात व्याख्या पुढे आल्या असतील. त्यातली NEWS : North-East-West-South ही सोपी, सुटसुटीत व्याख्या बहुतके भावी पत्रकारांना पटली असेल. सोपी व्याख्या आहे ती. बातमीत काय हवं? तर त्यात ‘5 W & 1 H’ ह्याची (Who? What? When? Where? Why? How?) उत्तरं मिळायला हवीत. कोण, काय, का, कधी, कुठे आणि कसे, हे ते सहा प्रश्न. मराठीत सहा ‘क’ -  विद्यार्थ्यांना हेही शिकवलं जातं. ‘Comment is free, but facts are sac...

विचित्र विश्व, अर्थात अतरंगी बातम्या!

लिहायला-वाचायला शिकल्यापासून पेपर वाचायला लागलो की , पेपर वाचायला लागल्यापासून लिहायला-वाचायला शिकलो , हे आठवणं अंमळ कठीणच आहे. कळतंय तेव्हापासून वाचतोय. पण वाचतोय तेव्हापासून कळतं आहेच , असं अजाबात नाही. सदर लेखकाची (म्हणजे सदर ‘ सदर ’ नव्हे , तर हा मजकूर लिहिणारा लेखक , सदर इसम या अर्थाने!) हीच गोची आहे. कळतंय तेव्हापासून वाचतोय. पण वाचतोय तेव्हापासून कळतं आहेच , असं अजाबात नाही. सदर लेखकाची (म्हणजे सदर ‘ सदर ’ नव्हे , तर हा मजकूर लिहिणारा लेखक , सदर इसम या अर्थाने!) हीच गोची आहे. अस्मादिकांना लहानपणापासून पेपर वाचण्याची फार्फार आवड. पण त्यातील अग्रलेख, लेख, स्फुटे, क्रीडा, अर्थव्यवहार आदी विषयांत आम्हाला कधीच रस नव्हता. राजकारणात चुलीत जावो, नाही तर (विनाअनुदानित) गॅसच्या शेगडीवर होरपळो; त्याच्याशी देणे-घेणे नाहीच! अतरंगी बातम्या हीच आपली आवड (रेखाटण सौजन्य - कृत्रिम बुद्धिमत्ता) ------------------------------ हटके बातम्या हीच खरी आपली आवड. उदाहरणार्थ –‘ शेळीने दिला चार करडांना जन्म ’, ‘ नागाच्या डोक्‍यावर बसला उंदीर ’, ‘ पपईत दिसला गणपती ’, ‘ दुधी भोपळ्यात आढळला मारुती ’ इत्यादी ...

खोडलेले ‘अ-क्षर’!

‘ क्षमस्व !’   या शीर्षकाने प्रसिद्ध झालेल्या  ‘ लोकसत्ता ’ च्या त्या चौकटीत  ‘ मी मन : पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो ’  असं प्रथम पुरुषी एकवचनी वाक्य आहे. याचा अर्थ ही दिलगिरी सामूहिक नसून एकट्या संपादकाची आहे . त्याच्याशी त्यांच्या संपादकीय मंडळाचा किंवा व्यवस्थापनाचा काहीही संबंध नाही. ह्याचा अर्थ असा की, याबाबत आम्ही संपादकांच्या मागे नाहीत किंवा आमचा त्यांना अजिबात पाठिंबा नाही, हे व्यवस्थापनाने न बोलताही दाखवून दिलं आहे ! ---------------------- वयाच्या सातव्या-आठव्या वर्षांपासून (मराठी) वृत्तपत्रं वाचतो आहे. पोटासाठी म्हणून २८ वर्षं वृत्तपत्रातच काम करतो आहे. कुणी तरी काम करताना दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे किंवा कुणाच्या हातून नकळत झालेली ‘ गल्लत-गफलत ’ आणि त्यावरून झालेला ‘ गहजब ’ याची चौकट अधूनमधून कोणत्या ना कोणत्या वर्तमानपत्रात ‘ दिलगिरी ’ , ‘ माफी ’ , ‘ क्षमस्व ’ ...अशा कुठल्या तरी एका शीर्षकाखाली दिसायचीही. नंतर नोकरी सुरू केल्यावर अशी चौकट आपल्या अंकात (आणि तीही आपल्यामुळं) छापून आली, तर तो दिवस वाईट जायचा. आणि तशीच चौकट प्रतिस्पर्धी अंकात दिसली ...
html