मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

आकाशवाणी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भुवीचे पुनरागमन, जर्सी नंबर ७८

भुवनेश्वरकुमार - सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य ः आयसीसी) ----------------------- भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी. नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली...

निमित्त एका गाण्याचं...

तंत्रज्ञानाच्या जगात एका क्लिकवर हवं ते गाणं मिळतं. पण रेडिओच्या जमान्यात अनपेक्षितपणे एखादं आवडतं गाणं लागण्यात असलेली जादू ह्या प्ले-लिस्टमध्ये आहे? अलेक्साच्या माध्यमातून, पण रेडिओवरच नुकतीच एक सुरांची खिडकी उघडली आणि... ------------ 'जल बिन मछली...'मधल्या एका गाण्यामुळं हे सगळं लिहिलं! .......... हजारो नव्हे, लाखो गाण्यांचं भांडार असलेली संकेतस्थळे उपलब्ध आहेत. वेळ कसा घालवायचा, असं कुणी विचारलं तर सांगतो, 'ह्या संकेतस्थळांना भेट द्या. शंभर वर्षांचं आयुष्य लाभलं आणि दिवसातले बारा तास निव्वळ गाणी ऐकवण्यात घालवले तरी एक संकेतस्थळही संपणार नाही. आता एवढं ऐकायला उपलब्ध आहे.' 'रोज एवढा वेळ गाणी ऐकून बहिरेपण तेवढं येईल!' जन्मजात औरंगजेब असलेला मित्र त्यावर म्हणाला. सांगायचा मुद्दा वेगळाच आहे. अर्थात गाण्याचाच आहे. एखादं गाणं अचानक मनात आलं, तर ते ऐकण्यासाठी आता वाट पाहावी लागत नाही. चुटकीसरशी शोधून ऐकता येतं. मध्यंतरी अशी आवडती गाणी शोधून ऐकत होतो. काही वेळा तर एकच गाणं सलग पाच-सहा वेळा ऐकत होतो. उदाहरणार्थ - कारवाँ गुज़र गया... (आता हे लिहिल्यावर ऐकावंच लागेल.)...
html